आसाममध्ये ११ घुसखोरांना अटक   

गुवाहाटी : आसाममध्ये 11 घुसखोरांना अटक करण्यात आली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा यांनी एक पोस्ट टाकून  दिली आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यापूर्वीच त्यांना अटक केल्याचे ते म्हणाले.जॉनी जॉनी यस पप्पा, दक्षिण सालमारामध्ये मात्र, नो पप्पा अशा आशयाची पोस्ट समाज माध्यमांवर मुख्यमंत्री सर्मा यांनी टाकली आहे. 11 जण बेकायदा भारतात घुसत होते. त्यांना तातडीने सीमेवरच पकडले आहे., असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.  ते कोणत्या देशाचे आहेत ? त्याचा तपशील त्यांनी दिलेला नाही. आसाम सरकार घुसखोरांबाबत दक्ष आहे, असे सांगताना ते म्हणाले, घुसखोरांना कोणत्याही वेळी आणि प्रत्येक दिवशी रोखले जाईल. दरम्यान, भारत आणि बांगला देश यांच्या दरम्यान 267.5 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. या सीमेवर श्रीभूमी, कचहर, धुरबी आणि दक्षिण सालमारा -मानकचर जिल्हयांचा समावेश आहे. तेथे घुसखोरांना रोखण्यासाठी चौक्या उभारल्या आहेत. सुतरकांडीची श्रीभूमी ही एकीकृत चौकी आहे. जी भारत आणि बांगला देश सीमेवरील मेघालयातील दावकी आणि त्रिपुरातील अंकुरा चौकीशी सलग्‍न आहे. 

Related Articles