E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीकरांना ३५ रुपये किलोने कांद्याची विक्री
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
नवी दिल्ली : नाशिकहून प्रवास करणारी कांदा एक्स्प्रेस आज (गुरुवारी) दिल्लीत पोहोचणार असून नागरिकांना सवलतीच्या दरात कांद्याची विक्री केली जाणार आहे. 35 रुपये किलो या प्रमाणे कांदा मिळणार असल्याने दिल्लीकर सुखावणार आहेत. देशभरात अचानक कांद्याचे दर वाढले होते. कांद्याचा प्रति किलोचा दर 55 ते 60 रुपये झाला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सवलतीच्या दरात कांदा विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या हस्ते अनुदानित कांद्याच्या विक्री केंद्राचे उद्घाटन होत आहे. बाजारात आणले जाणारे कांदे हे 2026 साठी उत्पादक राज्यांतील 1.21 लाख टनांच्या ’बफर स्टॉक’मधील (राखीव साठ्यातील) आहेत. किरकोळ बाजारातील हस्तक्षेपाची ही कार्यवाही ’नाफेड’ ’एनसीसीएफ’आणि ’केंद्रीय भंडार’ या तीन संस्थांमार्फत केली जाईल. प्रथम दिल्लीत नंतर एनसीआर परिसरात नागरिकांना सवलतीच्या दरात कांदा विकला जाईल, अशी माहिती नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनीस जोसेफ चंद्रा यांनी दिली. फेडरेशनकडे 62 हजार टन कांद्याचा राखीव साठा आहे. त्यापैकी 400 टन कांदा नाशिक येथून कांदा एक्स्प्रेसच्या माध्यमातून दिल्लीकडे रवाना करण्यात आला होता.
Related
Articles
पीएमआरडीएच्या प्रारूप संरचना योजनेच्या कामाला गती
02 Sep 2026
प्रत्येक अंगणवाडीला मिळणार हक्काची जागा
04 Sep 2026
वाचक लिहितात
03 Sep 2026
किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
05 Sep 2026
एकदा सांगच माधवा, तुझ्यातल्या ऊर्जेचं रहस्य?
05 Sep 2026
व्हाट्सऍप कट्टा
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार