E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भागवतांच्या न्यूयॉर्क दौर्याला महापौर ममदानी यांचा विरोध
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे अमेरिकेत आगमन झाले आहे. ते न्यूयॉर्कमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मात्र, त्यांच्या दौर्याला न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी बुधवारी जोरदार विरोध केला.
न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे भागवत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कार्यक्रम होत आहे. तेथे ते भारतीय वंशाच्या नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेेत. ममदानी यांनी सांगितले की, हा खासगी कर्यक्रम असल्याने तो शहराच्या अधिकार क्षेत्रात नाही. दरम्यान, भागवत यांचे मंगळवारी अमेरिकेत आगमन झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जगभर कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याद्वारे संघाची ध्येयधोरणे जगाला समजावून सांगितली जात आहेत. अशा प्रकारचे कार्यक्रम कॅनडा आणि ब्रिटनमध्ये आयोजित केले आहेत. त्या अंतर्गत न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 29 ऑगस्ट रोजी भागवत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. त्या कार्यक्रमात पाच हजारहून अधिक नागरिक सहभागी होत आहेत. मात्र, कार्यकक्रमाला अनेक नागरी हक्क संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. ममदानी यांनी देखील आता विरोध केला. ते म्हणाले, मी मेळाव्याला पाठिंबा देत नाही.
खासगी कार्यक्रमावर बंदी घालणे अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करता येणार नाही. एका पत्रकार परिषदेत याबाबतचा प्रश्न ममदानी यांना विचारला होता. त्यावर ते बोलत होते. दरम्यान, ममदानी हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असून न्यूयॉर्कचे पहिले भारतीय महापौर होण्याचा त्यांना मान मिळाला होता. त्यांच्या आईचे कुटुंब सध्या भारतात राहते. त्यांनी सांगितले की, आपल्या कुटुंबाकडून भारताची जी संकल्पना शिकायला मिळाली आणि ज्या वातावरणात आपण लहानाचे मोठे झालो, ती संकल्पना म्हणजे विविधता जपणारा समाज आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश. जिथे भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपलेपणाची भावना वाटत असे त्यांनी सांगितले.
Related
Articles
पुरावा समोर आल्यास पद सोडेन
08 Sep 2026
जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात तुमचा हात धरू शकत नाही
05 Sep 2026
डीजेविरोधात भूमिका घेणार्यास मारहाण
04 Sep 2026
व्हाट्सऍप कट्टा
07 Sep 2026
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
02 Sep 2026
सक्तीची हिंदी भाषा परीक्षा अधिकार्यांसाठी रद्द
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार