E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
विद्यार्थ्यांना कृती पुस्तिकेची प्रतिक्षा
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
पुणे
: राज्यातील 2026-27 हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटले, तरी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप कृती पुस्तिका पोहोचलेल्या नाहीत. पाठ्यपुस्तकातील धड्यांचा अभ्यास अधिक सोपा, रंजक आणि कृतीतून समजावून घेण्यासाठी तयार करण्यात येणार्या या पुस्तिका प्रथम घटक चाचणी तसेच गणेशोत्सवाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवरही विद्यार्थ्यांना मिळालेल्या नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कृती पुस्तिका तयार करण्यात येतात. पाठ्यपुस्तकातील आशय केवळ वाचनापुरता मर्यादित न राहता विविध कृती, प्रश्न, उपक्रम आणि सरावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तो समजावा, हा या पुस्तिकांचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणे, निरीक्षणशक्ती विकसित करणे आणि अभ्यासाबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी या पुस्तिका महत्त्वपूर्ण ठरतात.
शिक्षक आणि पालकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी संबंधित कृती पुस्तिका अभ्यासक्रमासोबत पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतरही 2026-27 या शैक्षणिक वर्षातील पुस्तिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रमातील अनेक धडे शिकवून झाल्यानंतरही त्यासंदर्भातील कृती, उपक्रम आणि सराव विद्यार्थ्यांना करता आलेले नाहीत.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणार्या कृतीपुस्तिकांच्या निर्मितीचे सुमारे 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले असून, गेल्या तीन-चार दिवसांत प्रकल्पासाठी प्रत्यक्ष निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता कृतीपुस्तिकांची छपाई आणि त्यानंतर राज्यभर वितरणाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
- हेमंत वसेकर,
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)
अभ्यासक्रमासाठी कृती अपेक्षित
कृती पुस्तिका विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध झाल्यास संबंधित धडा शिकवताना त्यातील उपक्रमही घेता येतात. मात्र, पुस्तिका उशिरा उपलब्ध झाल्यास आतापर्यंत शिकवून झालेल्या अनेक धड्यांशी संबंधित कृती एकाच वेळी पूर्ण करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार आहे. त्यामुळे पुस्तिकांचा मूळ उद्देशच बाधित होण्याची शक्यता आहे.
Related
Articles
मनरेगा रद्द केल्यामुळे गरिबांची जीवनरेखा नष्ट
02 Sep 2026
कचर्याचे साम्राज्य आणि भटक्या श्वानांचा सुळसुळाट
05 Sep 2026
शेती प्रश्नावर भांडणारे सत्तेच्या मखरात
08 Sep 2026
नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एफडीएची कारवाई : तुकाराम मुंडे
07 Sep 2026
दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणार्या १० मंडळांवर गुन्हे
08 Sep 2026
चिंध्या आणि फर्निचरच्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी रामटेकडीत प्रकल्प
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार