E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
तिसर्या फेरीत 3 हजार 756 विद्यार्थ्यांना संधी
पुणे
: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी तंत्रशिक्षणांतर्गत अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (थेट द्वितीय वर्ष बी.ई.,बी.टेक.) या तीन वर्षांच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरीची यादी जाहीर करण्यात आली. या फेरीत 36 हजार 803 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 756 नव्या विद्यार्थ्यांना प्रथमच प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर 3 हजार 790 विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तसेच 20 हजार 127 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील पुढील पसंतीसाठी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला आहे.
राज्यात थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी तिसर्या फेरीच्या गुणवत्ता यादीतील 70 हजार 38 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी निर्धारित मुदतीत 36 हजार 803 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले. या विद्यार्थ्यांचाच तिसर्या केंद्रीभूत प्रवेश फेरीसाठी विचार करण्यात आला. त्यापैकी 3 हजार 756 विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. तिसर्या फेरीत 3 हजार 790 विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, त्यांचा प्रवेश स्वयंचलितपणे निश्चित झाला आहे. अशा विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्यास त्यांना पुढील चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यांना त्यानंतर होणार्या खुल्या, म्हणजेच संस्थात्मक फेरीत सहभागी व्हावे लागेल.
Related
Articles
गणेशोत्सवाच्या परंपरेचा काँग्रेसला अभिमान
31 Aug 2026
धोम आणि तारळी धरण १०० टक्के भरले
01 Sep 2026
कास फुलोत्सवास आजपासून प्रारंभ
01 Sep 2026
जाहीर केलेला विकास दर योग्यच
03 Sep 2026
नेमबाज पूजा घाटकर यांची प्रशिक्षकपदी निवड
30 Aug 2026
‘एल निनो’चा पर्जन्यमान आणि तपमानावर मोठा परिणाम
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?