E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कारुआनाची प्रज्ञानानंदवर मात
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
ग्रँड चेस टूर
सेंट लुईसे
: ग्रँड चेस टूर अंतिम फेरीतील पहिल्या क्लासिकल सामन्यात अमेरिकेच्या ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाने भारताच्या आर. प्रज्ञानानंदाचा पराभव केला. या विजयासह कारुआनाने अंतिम लढतीत 6-0 अशी आघाडी घेतली असून दोघांमधील दुसरा क्लासिकल सामना बुधवारी खेळला जाणार आहे. सामना बराच काळ बरोबरीत होता. मात्र, 28व्या चालीत प्रज्ञानानंदाकडून झालेल्या चुकीचा कारुआनाने अचूक फायदा घेत निर्णायक आघाडी मिळवली आणि डाव आपल्या नावावर केला.
दरम्यान, तिसर्या स्थानासाठीच्या लढतीत व्हिन्सेंट कीमर आणि वेस्ली सो यांच्यातील पहिला क्लासिकल सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे दोघांचे गुण 3-3 असे आहेत. कारुआनाने सामन्यानंतर सांगितले की, त्यांना सुरुवातीला कोणतीही विशेष आघाडी दिसत नव्हती आणि 26व्या चालीपर्यंत ते स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यानंतर तीन चालींनी प्रज्ञानानंदाकडून चूक झाली. या चुकीमुळे कारुआनाला निर्णायक संधी मिळाली आणि त्यांनी तिचे विजयात रूपांतर केले. कारुआना-प्रज्ञानानंदा आणि कीमर-सो यांच्यातील दुसरा क्लासिकल सामना 26 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. सामना बरोबरीत राहिल्यास बोनस टायब्रेकरचीही शक्यता आहे. गुरुवारी रॅपिड आणि ब्लिट्झ सामने खेळवले जातील. ग्रँड चेस टूर फायनल्स 2026 ही स्पर्धा 22 ते 27 ऑगस्टदरम्यान सेंट लुईसमध्ये होत आहे.
Related
Articles
बिहारमध्ये गंगेसह उपनद्यांना पूर
07 Sep 2026
इतिहासाला नवे पंख एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा
03 Sep 2026
शेवटच्या श्रावणी सोमवारी भीमाशंकर मंदिरात लाखो भाविक
08 Sep 2026
शालेय पोषण आहारातील वाटाण्याला कीड
04 Sep 2026
उकडीच्या मोदकांना यंदा दुप्पट मागणी!
06 Sep 2026
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार