E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारताचा पहिला सामना 28 सप्टेंबरला
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
आशियाई क्रीडा स्पर्धा
नवी दिल्ली
: जपानमध्ये होणार्या आशियाई क्रिडा स्पर्धेतील क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर झाले असून, भारतीय पुरुष संघ 28 सप्टेंबरला थेट उपांत्यपूर्व फेरीतून अभियानाला सुरुवात करेल. स्पर्धेत 10 पुरुष संघ सहभागी असून, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. उर्वरित सहा संघ प्राथमिक फेरी खेळतील. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचल्यासच होऊ शकतो. नागोयाजवळील कोरोगी अॅथलेटिक पार्क येथे ही स्पर्धा होणार आहे. भारताचा सामना ग्रुप-अ मधील दुसर्या क्रमांकाच्या संघाशी होईल. या गटात अफगाणिस्तान, नेपाळ आणि जपान यांचा समावेश असून, अफगाणिस्तान अव्वल आणि नेपाळ दुसर्या स्थानावर येण्याची शक्यता आहे.
महिला संघाचा पहिला सामना जपानविरुद्ध
भारतीय महिला संघ 18 सप्टेंबरला जपानविरुद्ध पहिला सामना खेळेल. महिला गटात आठ संघ असल्याने उपांत्यपूर्व फेरीतील सामने आधीच निश्चित करण्यात आले आहेत. एशियन गेम्ससाठी भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर, तर उपकर्णधारपद तिलक वर्मा यांच्याकडे आहे. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश करण्यात आला आहे.महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर, तर स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
पुरुष संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
Related
Articles
व्हाट्सऍप कट्टा
07 Sep 2026
जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा, जामखेडमध्ये कडकडीत बंद
05 Sep 2026
भारताला महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद
04 Sep 2026
जीएसटी संकलन घटले
02 Sep 2026
पुणे महापालिकेतील शिपायावर गुन्हा
06 Sep 2026
मनरेगा रद्द केल्यामुळे गरिबांची जीवनरेखा नष्ट
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार