E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मिचेल स्टार्क कसोटीतील अव्वल गोलंदाज
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
दुबई
: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने जसप्रीत बुमराला मागे टाकत प्रथमच आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्ध मॅके येथे झालेल्या कसोटीत 10 विकेट घेत स्टार्कने दोन स्थानांची झेप घेतली. त्याचे 872 रेटिंग गुण असून, 862 गुणांसह बुमराह दुसर्या क्रमांकावर घसरला आहे.बुमराहने एकूण 697 दिवस जगातील नंबर-1 कसोटी गोलंदाज म्हणून स्थान राखले आहे. 7 फेब्रुवारी 2024 रोजी तो प्रथमच अव्वल स्थानी पोहोचला होता. 2025 मध्ये बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत 9 विकेट घेत 907 रेटिंग गुणांचा भारतीय विक्रम केला होता. जून 2026 मध्ये न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीसोबत तो संयुक्तपणे नंबर-1 ठरला होता.
सुथारची 28 स्थानांची झेप
भारताचा डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने 28 स्थानांची झेप घेत 48वे स्थान मिळवले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत 7, तर श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत 10 विकेट घेत त्याने प्रभावी कामगिरी केली. 36 वर्षीय स्टार्कने 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत नंबर-1 स्थान मिळवले. बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या कसोटीत त्याने 10 विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाने आणि 51 धावांनी विजयात मोलाची भूमिका बजावली.
पंत सातवा, गिल आठवा
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत हॅरी ब्रूक अव्वल, जो रूट दुसर्या, स्टीव्ह स्मिथ तिसर्या आणि ट्रॅव्हिस हेड चौथ्या स्थानावर कायम आहेत. भारताचा ऋषभ पंत सहा स्थानांची झेप घेत संयुक्त सातव्या, तर शुभमन गिल आठव्या क्रमांकावर आहे.
Related
Articles
खाद्यपदार्थ पुरवणे, मृतदेह हलविण्यासाठी ड्रोनचा वापर
03 Sep 2026
भारताची विजयी सलामी
01 Sep 2026
न्यायाधीशांच्या बंगल्यावर चोरट्यांचे लक्ष्य
31 Aug 2026
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
30 Aug 2026
मटण-चिकन विक्रेत्यांना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे धडे
30 Aug 2026
बिहारमध्ये दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा नापास शिक्का पुसला
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?