अमेरिकेकडून व्हिसाबाबतच्या मुलाखती रद्द   

वॉशिंग्टन : अमेरिकेतील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने कंबर कसली आहे. त्या अंतर्गत स्थलांतरविषयक धोरण अधिक कठोर केले आहे. त्यानसार जागतिक पातळीर  व्हिसाबाबतच्या मुलाखती रद्द केल्या आहेत.
 
'फायनान्स टाईम्स'च्या वृत्तानुसार अमेरिकेच्या प्रशिक्षण कॉन्सुलर अधिकारी यांना व्हिसाबाबातच्या मुलाखती घेऊ नयेत, नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे बजावले आहे. निर्वाह सहाय्यावर अवलंबून राहणार्‍या किंवा ’सार्वजनिक भार’ या व्याख्येत मोडणार्‍या व्यक्तींची छाननी करण्यावर अधिकार्‍यांचे प्रशिक्षण केंद्रित असते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकार्‍यांच्या हवाल्याने वृत्तपत्राने म्हटले आहे. 
 
’पब्लिक चार्ज’ ही संज्ञा अमेरिकेच्या स्थलांतर विभागाच्या अधिकार्‍यांकडून अशा व्यक्तीसाठी वापरली जाते, जी आर्थिक आधारासाठी प्रामुख्याने सरकारवर अवलंबून राहण्याची शक्यता असते. एका अहवालानुसार, अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये मुलाखतींची वेळ निश्चित असलेल्या व्हिसा अर्जदारांना ई-मेल्स प्राप्त झाले आहेत. यामध्ये त्यांच्या भेटीची वेळ  बदलण्यात आल्याचे आणि नवीन तारीख व वेळेबाबत भविष्यात सूचना दिली जाईल, असे कळवण्यात आले आहे. 
 
यामुळे व्हिसा अर्जदार अमेरिकेतील सरकारी लाभांवर अवलंबून राहणार नाहीत, याची खात्री होईल, असा दावा ’परराष्ट्र विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. अधिक समृद्ध अमेरिका घडवणे म्हणजे व्हिसा अर्जदार अमेरिकेचे कायदे आणि नियमांनुसार ’पब्लिक चार्ज’ ठरणार नाहीत आणि गरजू व पात्र अमेरिकनांसाठी राखीव असलेल्या सरकारी लाभांवर अवलंबून राहणार नाहीत, याची सुनिश्चिती करणे होय, असे परराष्ट्र  विभागाच्या प्रवक्त्याने फायनान्सीयल टाइम्सला साांगितले.
 

Related Articles