कर्नाटकातील सरोवरात सापडले महिला आणि पाच मुलांचे मृतदेह   

विजयपुरा : कर्नाटकच्या  विजयपुरामधील भुंताल सरोवरात बुधवारी  महिला आणि तिच्या पाच मुलांचे मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. त्यांनी आत्हमत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके समजले नसल्याची माहितीही अधिकार्‍यांनी दिली. 
 
शोभा (वय ३५) आणि त्यांची मुले विद्या (वय १५), सुवर्णा (वय १३), तिप्पारय्या (वय १२), सानिका (वय १०) आणि विकास (वय ६) यांचे मृतदेह सापडले होते. सर्वजण सरोवराकाठी आले होते आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. मृतदेहांची पुढील तपासणी आणि  न्यायवैद्यक तपासणीनंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण उघड होईल. दरम्यान, सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास मृतदेहाबाबतची माहिती मिळाली. विजयपुरा ग्रामीण पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार २४ ऑगस्टला शोभा यांचे पती मल्लिकार्जुन जलगिरी यांनी दिली होती. घरगुती वादातून शोेभा आणि चार मुलांनी सकाळी ६ वाजता घर सोडले होते. यानंतर सर्वजण कर्णबधीर लहान मुलाला वसतिगृहातून नेण्यासाठी गेल्या होत्या. यानंतर त्यांची माहिती मिळाली नाही. मृतांमध्ये तीन मुली आणि दोन मुले आहेत.   
 

Related Articles