E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वातावरणातील बदलामुळे तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता
Wrutuja pandharpure
26 Aug 2026
स्वाईन फ्लूपासून बचावासाठी खबरदारी घेण्याचे पालिकेचे आवाहन
पिंपरी
: वातावरणातील बदलामुळे तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून, त्याचबरोबर स्वाईन फ्लूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असून सर्दी, खोकला, घसादुखी, ताप तसेच श्वसनाशी संबंधित विविध लक्षणे आढळू शकतात. वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
1 जानेवारी 2026 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात इन्फ्लुएंझा बाधित 19 रुग्ण आढळून आले आहेत. योग्य वेळी घेतलेला वैद्यकीय सल्ला व उपचारांमुळे या कालावधीत एकही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागरिकांनी आजाराच्या लक्षणांबाबत अनावश्यक भीती न बाळगता वेळेत नजिकच्या मनपा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून आजाराचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होईल.
स्वाईन फ्लूपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी
सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आदी लक्षणे आढळल्यास तातडीने महापालिका दवाखाना अधिकार्यांचा सल्ला घ्यावा.वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. पोषक व संतुलित आहार घ्यावा. धूम्रपान टाळावे. शरीराला पुरेशी झोप व विश्रांती द्यावी. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे.
आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा. खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंड रुमालाने अथवा टिश्यूने झाकावे. त्यानंतर हातांची स्वच्छता राखावी.ताप, सर्दी, खोकला किंवा घसादुखी यांसारखी लक्षणे जाणवत असल्यास नागरिकांनी स्वतःहून औषधोपचार करू नयेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधांचा वापर करावा. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लू आजारासाठी आवश्यक औषधोपचार उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. वातावरणातील बदलाच्या काळात नागरिकांनी स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आजाराची लक्षणे आढळल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य उपचार सुरू करावेत, असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Related
Articles
ऑगस्टमध्ये यूपीआयचे २९.८ लाख कोटींचे व्यवहार
02 Sep 2026
इको फ्रेंडली बाप्पांसोबत मिळणार सीड बॉल
07 Sep 2026
डीजेविरोधात भूमिका घेणार्यास मारहाण
04 Sep 2026
पृथ्वीच्या निरीक्षणासाठी इस्रोचा नवा उपग्रह
05 Sep 2026
शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची पसंती
02 Sep 2026
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार