पिंपरी : पुणे मेट्रो लाईन क्र. 3 अंतर्गत वाकड परिसरात प्रस्तावित असलेल्या मेट्रो स्थानकास भुजबळ चौक मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे देण्यात आले. वाकड परिसरातील भुजबळ चौक हे स्थानिक ओळख आणि सामाजिक संदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे प्रस्तावित मेट्रो स्थानकास भुजबळ चौक मेट्रो स्टेशन असे नाव दिल्यास वाकड परिसराची स्थानिक ओळख अधिक अधोरेखित होईल. असे निवेदनात म्हटले आहे. वाकड परिसरातील प्रस्तावित डी.पी. रस्ते व शिवरस्त्यांच्या विकासकामांना गती देणे, वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, याबाबतही प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राम वाकडकर, नगरसेविका श्रुती वाकडकर, रेश्मा भुजबळ, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, प्रमोद चौधरी उपस्थित होते.
Fans
Followers