E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दोन आठवड्यांत शरण या
Samruddhi Dhayagude
26 Aug 2026
सर्वोच्च न्यायालयाचे तरुण तेजपाल यांना निर्देश
नवी दिल्ली : ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना दोन आठवड्यांत शरण येण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. २०१३ मधील बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने तेजपाल यांना १० वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, शरण येण्यापासून सवलत मिळावी, अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्यासमोर हा अर्ज सुनावणीसाठी आहे. न्यायालयाने तेजपाल यांची शरण येण्यासंदर्भातील विनंती फेटाळून लावली. तर, दोषसिद्धी आणि शिक्षेला आव्हान देणार्या अर्जावर २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल, असे स्पष्ट केले. मात्र, त्याआधी शरण आल्याबाबतचे प्रमाणपत्र २२ सप्टेंबरपूर्वी सादर करावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तेजपाल यांना पाच वर्षांपूर्वी गोवा सत्र न्यायालयाने निर्दोष ठरविले होते. गोवा सरकारने यास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने गोवा सत्र न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करताना तेजपाल यांना १० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली होती.
Related
Articles
नीट-पीजीच्या फेरपरीक्षेचा जनहित अर्ज फेटाळला
04 Sep 2026
हल्ला केल्यास तेलवाहू जहाजे बुडवू
07 Sep 2026
इस्रायलच्या हल्ल्यात लेबाननमध्ये बारा ठार
08 Sep 2026
दहा दिवसांनी ढिगार्यातून वृद्ध महिला जिवंत बाहेर
07 Sep 2026
सोमेश्वर कारखान्यात पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’?
08 Sep 2026
वाचक लिहितात
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार