श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन ठिकाणी कारवाई करुन दहशतवाद्यांसाठी काम करणार्या आठ जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकार्यांनी मंगळवारी दिली. पोलिस आणि लष्कराच्या जवानांना त्यांच्याबाबत माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी शाँपिया जिल्ह्यातील नझिर अहमद वाणी याच्या मालकीच्या इमामसाहिब येथील फळबागेमध्ये संयुक्तपणे कारवाई केली. शोध मोहिमेत सुरक्षा दलांनी एक हातबॉम्ब, दोन एके मॅगझिन, चार मोबाइल आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे फलक जप्त केले. आठ पैकी तिघांची ओळख पटली आहे. आशिक हुसैन कुार अरिफ कुमार आणि हॅरि मंजूर, अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी रात्री तिघांना सुरक्षा दलांनी अटक केली. हिज्बउल्ल मुजाहिदीन संघटनेशी संबंधित तीन जण दुचाकीवरुन जात असताना पकडले होते. त्यांच्याकडे दोन हातबॉम्ब आणि घातक साहित्य सापडले होते. जुनैद अहमद डार, अमीर युसूफ आणि जुनैद मुजफ्फर, अशी तिघांची नावे आहेत. आणखी एका कारवाईत दोन संशयितांना पुलवामा जिल्ह्यातून अटक केली. त्यामुळे या परिसरातील दहशतवादीी जाळेे नष्ट होण्यास चालना मिळाली. लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने दोघांना यारवान जंगलातून अटक केली. लतिफ अहमद दिदाद आणि ऐयाझ अहमद बाजीद, अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पिस्तूल आणि हातबॉम्ब जप्त केला. कारवाईत एक पिस्तूल, १२ गोळ्या, एक हातबॉम्ब त्यांच्याकडून जप्त केला. शस्त्रात्र कायद्याचे उल्लंघन आणि बेकायदा कृती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यांनी शस्त्रास्त्रे कोठून मिळवली ? त्यांचे लागेबांधे कुठपर्यंत आहेत ? याचा तपास करण्यात येणार आहे.
Fans
Followers