E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
काश्मिरी पंडितांच्या हत्येचा तीन दशकांनी पुन्हा तपास
Samruddhi Dhayagude
26 Aug 2026
१९९८ मधील घटनेची फाइल होणार खुली
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात १९९८ मध्ये दहशतवाद्यांनी २३ काश्मिरी पंडितांची गोळ्या झाडून हत्या केली होती ’वांधामा हत्याकांड’ म्हणून ओळखल्या जाणार्या या घटनेचा तपास राज्य तपास यंत्रणेने पुन्हा सुरू केला आहे, अशी माहिती अधिकार्यांनी मंगळवारी दिली.
काश्मिरी पंडितांच्या हत्येशी संबंधित अनेक प्रकरणांचा तपास एसआयएने नव्याने सुरू केला आहे, त्याच मालिकेचा एक भाग म्हणून वांधामा हत्याकांड प्रकरणाचा तपास पुन्हा हाती घेण्यात आला आहे. त्याद्वारे दहशतवादी आणि त्यांना मदत करणार्या व्यक्तींची ओळख पटवणे तसेच ा हत्याकांडातील त्यांची भूमिका स्पष्ट करणे, हा हेतु आहे २५ जानेवारी १९९८ रोजी, मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील वांधामा गावात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित कुटुंबांच्या घरात घुसून २३ जणांची हत्या केली होती; मृतांमध्ये नऊ महिला आणि चार मुलांचा समावेश होता.
प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी लष्कराचा गणवेश परिधान केलेला दहशतवाद्यांचा एक गट गावात आला होता. त्यांनी रहिवाशांशी संवाद साधला आणि पंडित कुटुंबांना एका ठिकाणी जमण्यास सांगितले; त्यानंतर गोळीबार करुन २३ जणांची हत्या केली होती. सर्व जण चार कुटुंबांतील होते. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला दहशतवाद उफाळून आल्यानंतरही पंडितांनी खोरे सोडले नव्हते. या प्रकरणी गांदरबल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु हे प्रकरण जवळपास तीन दशकांपासून अनिर्णित राहिले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे हत्याकांड लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी घडवून आणले होते.
अनिर्णित राहिलेल्या दहशतवादी प्रकरणांची पुन्हा तपासणी करणे आणि गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणणे या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून हा तपास पुन्हा सुरू करण्यात आला असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
काश्मिरी पंंडित पुन्हा दहशतवाद्यांचे लक्ष्य?
काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाची हस्तक संघटना युनायटेड लिबरेशन कौन्सिलने एक ऑनलाइन हिट लिस्ट तयार केली आहे. . त्यामुळे काश्मिरी पंडित कर्मचारी आणि रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. त्यात काश्मीर आणि जम्मूमध्ये राहणार्या व्यक्तींची नावे, फोन नंबर आणि अचूक निवासी पत्त्यांसह वैयक्तिक माहिती दिली आहे.आता सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाच्या सत्यतेची पडताळणी करत असून, माहिती प्रसारित करणार्या व्यक्तींचा शोध घेत आहेत.
Related
Articles
महाभूमी स्टॅक.... एका क्लिकवर मिळणार जमिनीचा सर्च रिपोर्ट
02 Sep 2026
इस्रोचे खासगीकरण नाही
08 Sep 2026
एसआयआर कायदेशीर; पण योग्य नाही
05 Sep 2026
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक
07 Sep 2026
इको फ्रेंडली बाप्पांसोबत मिळणार सीड बॉल
07 Sep 2026
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स क्षेत्रात पुणे देशात अग्रेसर असणार
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार