E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मुलांच्या चोरट्या व्यापाराचे जाळे उद्ध्वस्त
Samruddhi Dhayagude
26 Aug 2026
अरुणाचलमध्ये १९ मुलांची सुटका
इटानगर : अरुणाचल प्रदेशात मुलांच्या चोरट्या व्यापाराचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले असून १९ मुलांची सुटका करण्यात यश आले. या प्रकरणी तिघांना अटक केली.जिल्हा बालकल्याण समितीने नामसी पोलिस ठाण्यात १७ ऑगस्ट रोजी तक्रार केली होती. यानंतर शि-योमी जिल्ह्यातील मेचुका, पश्चिम सियांगमधील आलो, पूर्व सियांगमधील पासीघाट, नाहरलागुन, इटानगर आणि लाँगडिंगमधून मुलांची सुटका केली. शोध घेण्यासाठी जिल्हा पातळीवरील विशेष तपास पथकाची स्थापना केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक तपासात उघड झाले की, आर्थिकदृष्ट्या खडतर जीवन जगणार्या कुटुंबाना मुलांना चांगले शिक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मुलांना विविध ठिकाणी पकडून ठेवले होते. सुटका करण्यात आलेली मुले आठ वर्षांखालील आहेत.दलाल आणि पालक यांच्या बँक खात्यात दहा ते पन्नास हजार रुपयाचे व्यवहार झाले असल्याचे तपासात आढळून आले. घरगुती काम आणि हॉटेलमध्ये काम करण्यासाठी मुलांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. न्यायाधीशांनी मुलांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्याची नोंद ठेवली असल्याची माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली. विशेष तपास पथक आता आर्थिॅक व्यवहाराचा, डिजिटल पुरावे आणि फोन कॉलचा माग काढत आहेत. त्याद्वारे मुलांच्या चोरट्या व्यापाराचे जाळे कुठपर्यत आहे ? ते शोधले जात आहे. अशा प्रकारे पकडून ठेवलल्या मुलांची माहिती नागरिकांनी द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.
Related
Articles
विद्यानंद बापटांना मारहाण करणार्याला न्यायालयीन कोठडी
06 Sep 2026
गणरायाच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी मखरांची सजावट
05 Sep 2026
मनरेगा रद्द केल्यामुळे गरिबांची जीवनरेखा नष्ट
02 Sep 2026
दयावान ग्रुपची दहीहंडी ठरली वैशिष्ट्यपूर्ण
07 Sep 2026
‘एनसीएमसी’ कार्डचा पहिल्याच दिवशी बोजवारा
02 Sep 2026
एल-निनोच्या संकटावर जलसंधारणाचा उपाय; 34 गावांना दिलासा
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार