संसदीय समितीच्या बैठकीत खडाजंगी   

नवी दिल्ली : जंतर-मंतरवर आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी २० जुलै रोजी काढलेल्या ‘चलो संसद’ मोर्चावर पोलिसांनी बळाचा वापर केला होता. विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी मंगळवारी संसदीय समितीच्या बैठकीत केली. मात्र, त्यावरुन जोरदार खडाजंगी झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 
’मुलांवरील गुन्हे’ या विषयावर विविध मंत्रालयांच्या अधिकार्‍यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्य ’गृहविषयक संसदीय स्थायी समिती’च्या बैठकीत काँग्रेसचे सदस्य अजय माकन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आंदोलकांवरील बळाच्या वापराचा मुद्दा चर्चेसाठी घेतला जावा, अशी मागणी माकन यांची होती.

Related Articles