राम रहिम पुन्हा तुरुंगाबाहेर   

चंडीगड: अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेला ’डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याची मंगळवारी सकाळी रोहतक येथील सुनारिया तुरुंगातून २१ दिवसांसाठी सुटका करण्यात आली. विशिष्ट कालावधीसाठी त्याला तुरुंगाबाहेर राहण्यास परवानगी देण्यात आली.
 
ऑगस्ट २०१७ मध्ये दोषी ठरल्यापासून तुरुंगातून  बाहेर पडण्याची त्याची ही १७ वी वेळ आहे.राम रहीम हा दोन अनुयायांवर अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. हरयानातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगात  त्याला ठेवले होते. फरलोच्या कालावधीत तो सिरसा येथील आपल्या डेर्‍यात राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी त्याला तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी मंजुरी दिली. या वर्षात त्याची ही तिसरी सुटका आहे. यापूर्वी त्याला मे आणि जानेवारीत अनुक्रमे ३० आणि ४० दिवसांचा ’पॅरोल’ मंजूर करण्यात आला होता.

Related Articles