E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भाजपचे नगरसेवक अडचणीत सापडले
Wrutuja pandharpure
26 Aug 2026
पुणे
: भारताचे माजी उद्योग आणि पुरवठामंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी प्रत्येकाने दहा मिनिटे तरी बोलायला हवे, ज्यांना त्यांच्याविषयी माहिती नाही, ती होईल, अशी अचानक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंगळवारी महापालिका सभागृहात केल्याने काही काळ भाजप नगरसेवक कात्रीत अडकले. हे उपरोधिक आहे हे लक्षात आल्यावर आणि आपल्याला त्याचे उत्तर देता येणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी विरोधाचे शस्त्र उपसले आणि माफीची मागणी करत गदारोळ केला.
भारताचे माजी उद्योग आणि पुरवठामंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे तैलचित्र महापालिकेत लावावे आणि त्याला दरवर्षी पुष्पहार अर्पण करावा, असा प्रस्ताव सभागृह नेते गणेश बिडकर आणि अर्चना पाटील यांनी मुख्यसभेत दिला होता. त्यावर बालवडकर यांनी दुरुस्तीची उपरोक्त उपसूचना दिली होती. त्यात भारताच्या अखंडतेसाठी बलिदान देणारे, 370 कलमला सर्वप्रथम विरोध करणारे, ’एक देश मै दो विधान, एक देश मै दो निशान, एक देश मै दो प्रधान नहीं चॅलेंगे’, अशी घोषणा देणारे राष्ट्रभक्त स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठामंत्री, श्यामाप्रसाद मुखर्जी असा उल्ले लेख प्रस्तावात करावा, अशी दुरुस्ती प्रस्तावात करावी अशी उपसूचना बालवडकरांनी दिली. ही मागणी उपरोधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच याविषयी कोणालाही बोलता येणार नाही हे लक्षात आल्यावर आपण अपमान करत आहात, आपण शब्द मागे घ्या, माफी मागा अशी मागणी सत्ताधारी भाजप ने करण्याला सुरुवात केली.
Related
Articles
जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात तुमचा हात धरू शकत नाही
05 Sep 2026
स्टॅलिन यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
04 Sep 2026
पोलिसांच्या कारवाईत ३५.५९ लाखांची गांजाची झाडे जप्त; एकावर गुन्हा
05 Sep 2026
‘लाजाळू’ एकांकिका ठरली पुरुषोत्तम करंडकाची मानकरी
07 Sep 2026
महाराष्ट्रासह मध्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा
08 Sep 2026
हिंजवडी आयटी पार्कमध्ये शेकडो अभियंते रस्त्यावर
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार