E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे महापालिका घेणार एक हजार 167 कोटींचे कर्ज
Wrutuja pandharpure
26 Aug 2026
पायाभूत सुविधांसाठी निर्णय; सर्वसाधारण सभेची मान्यता
पुणे
: शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेने पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी 1,167 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे,. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड (यूसीएफ) अंतर्गत या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँका, वित्तीय संस्था तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक कर्ज प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त पावनीत कौर यावेळी म्हणाल्या, केंद्र शासनाकडून या योजनेसाठी 50 टक्के निधी देण्यात येणार आहे. राज्यातून नाशिक आणि पुणे या दोन महापालिकेने यासाठी प्रस्ताव पाठवत होता. देशात सर्वात प्रथम पुणे महापालिकेला या योजनेतून निधी मिळाला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव महापालिकेच्या फायद्याचा असल्याचे कव्हर यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले
महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कर्जासाठी सुमारे 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रस्तावित प्रकल्पांसाठी अधिक निधीची आवश्यकता असल्याने अर्थसंकल्पात आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी स्थायी समिती तसेच मुख्य सभेची मंजुरी घेण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची आवश्यकता भासल्यास, आवश्यक तेवढ्या रकमेपर्यंत अर्थसंकल्पात बदल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचाही प्रस्ताव आहे.
Related
Articles
लष्करासाठी ‘स्पर्श’द्वारे पेन्शनची माहिती
04 Sep 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रखर लेझर, बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी सांगवीतील गणेश मंडळाच्या अध्यक्षाला शिक्षा
05 Sep 2026
एसआयआरमधील दावे-हरकतींसाठी मतदारांना मुदतवाढ द्या!
03 Sep 2026
अमेरिकेचा ‘व्हिसा अटॅक’; भारतीय प्रवाशांवर परिणाम
05 Sep 2026
पीएमपीच्या अनियमित सेवेमुळे प्रवाशांचा संताप
07 Sep 2026
शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची पसंती
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार