E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच
Wrutuja pandharpure
26 Aug 2026
पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती
पुणे
: गणेशोत्सव आणि दहीहंडीमध्ये तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच असल्याची स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. मीड प्रेशर तसेच प्लाझामा असणार्या डीजेवर थेट जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याची मागणी गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मात्र, पुणे पोलिसांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला स्पष्ट विरोध दर्शविला असून, उत्सव साजरा करण्यास विरोध नाही; मात्र तीव्र आवाज करणार्या डीजेवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करून तीव्र आवाजात डीजे वाजविल्यास थेट जप्ती केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने 24 ऑगस्टला महापालिकेत विविध विभाग, पोलिस प्रशासन तसेच गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून उत्सवावरील निर्बंध शिथिल करून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरा करण्याची मागणी करण्यात आली होती. ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी ध्वनीची पातळी निश्चित केली जाणार आहे. डीजेमध्ये किती ‘बेस’ आणि किती ‘टॉप’ वापरता येईल, याबाबतही नियमांच्या चौकटीत चर्चा करण्यात येणार आहे.
नियमभंग केल्यास थेट जप्ती
नियमांचे उल्लंघन करून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविणार्या मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. थेट डीजे जप्ती करण्यात येईल. डीजे, प्लाझा तसेच मिड प्रेशर सारख्या कर्णकर्कश आवाज करणार्या साधनांवर पूर्णपणे बंदी राहणार, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
उत्सव साजरा करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ध्वनिप्रदूषण करणार्या तीव्र आवाजाला परवानगी दिली जाणार नाही. प्लाझा आणि प्रेशर हॉर्नवर पूर्णपणे बंदी राहील. आवाजाची ठरलेली मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त
Related
Articles
साखर झाली पाच रुपयांनी स्वस्त
06 Sep 2026
हिमालयाची बदलती ‘लय’
06 Sep 2026
गदर पार्टीचे राजदूत - डॉ. मथुरा सिंह
04 Sep 2026
नेपाळच्या महापुरातून शेवगावच्या योगिनी पाटील सुखरूप
08 Sep 2026
नऊ दिवस मृत्यूशी झुंज
05 Sep 2026
जाहीर केलेला विकास दर योग्यच
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार