E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शेंगदाणाच्या दरात घट नाहीच
Wrutuja pandharpure
26 Aug 2026
आवक मर्यादित; वाढलेले दर टिकून राहणार
पुणे
: साखर आणि गुळा पाठोपाठ शेंगदाणाचे दर वाढत आहेत. मागील आठवड्यात किलोच्या दरात पुन्हा 2 ते 3 रूपयांनी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत बाजारात होणारी आवक मर्यादित आहे. त्यामुळे सण आणि उत्सवाच्या काळात शेंगदाणाचे वाढलेले दर टिकून राहणार असल्याची माहिती व्यापारी अनील लुंकड यांनी दिली.
नवीन शेंगदाणा बाजारात दाखल होण्यास दीड ते दोन महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यात शेंगदाण्याचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. श्रवण महिना सुरू आहे. येणार्या कळातही सण आणि उत्सव आहेत. त्यामुळे व्यापार्यांसह ग्राहकांकडून शेंगदाणाला मागणी वाढली आहे. त्यामुळेच घाऊक बाजारातील दरात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी किरकोळ बाजारातील दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.
मार्केटयार्डातील भुसार बाजारात रोज 100 टनाची आवक होत आहे. ही आवक राज्यातील विविध भागासह कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशातून शेंगदाणाची आवक होत आहे. शिल्लक शेंगदाणाचे प्रमाण कमी असल्यामुळे येत्या काळात आवकेत आणखी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसे झाल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी शेंगदाणाचे दर 10 ते 20 टक्क्यांनी अधिक आहेत. येणार्या हंगामात शेंगदाणाचे उत्पादन वाढेल किंवा घटेल, हे पावसावर अवलंबून असणार आहे. येत्या काळात असाच पाऊस कमी राहिल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पाऊस चांगला झाला, तर उत्पादन वाढेल, परिणामी आवक वाढल्यास वाढलेले दर कमी होण्यास मदत होईल, असेही अनील लुंकड यांनी सांगितले.
श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात सणही अधिक असतात. त्यानंतरही सण आणि उत्सव आहेत. त्यामुळे शेंगदाणाला मागणी वाढली आहे. ही मागणी दिवाळीपर्यंत कायम असणार आहे. मागणीच्या तुलनेत आवक होत नसल्यामुळे दरात वाढ झाली आहे. वाढलेले दर आणखी काही काळ टिकून राहणार असल्याचा अंदाज आहे.
-अनिल लुंकड, व्यापारी, मार्केटयार्ड
घाऊक बाजारातील किलोचे दर
शेंगदाणा
दर
घुंगरू 130 ते 140
स्पॅनिश 145 ते 154
जाडा 114 ते 127
Related
Articles
आळंदीतील गणेशोत्सवात डीजेला बंदी
02 Sep 2026
थकीत ऊस बिलासाठी शेतकर्यांचे झाडावर आंदोलन
08 Sep 2026
सात्विक-चिराग उपांत्य फेरीत
06 Sep 2026
मावळातील वारंगवाडीत ढोल-ताशांच्या गजरात रंगला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा
08 Sep 2026
जितेंद्र मिश्रा अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी
02 Sep 2026
पीएमआरडीएच्या प्रारूप संरचना योजनेच्या कामाला गती
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार