E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘डिव्हाइस फॉर ड्रीम्स’द्वारे डिजिटल दरी मिटेल
Wrutuja pandharpure
26 Aug 2026
संगणक देण्यासाठी उद्योग क्षेत्राला मदतीची हाक
पुणे
: तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक ठरत असले, तरी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना डिजिटल उपकरणांअभावी आधुनिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. ही डिजिटल दरी कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘डिव्हाइस फॉर ड्रीम्स-डोनेट अ डिव्हाइस, बिल्ड अ ड्रीम’ हे अभियान हाती घेतले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉप आणि टॅबलेट उपलब्ध करून देत त्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. संकलित उपकरणांच्या माध्यमातून शाळांमध्ये आधुनिक संगणक प्रयोगशाळा विकसित करण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे साडेआठ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत संगणक आणि अन्य डिजिटल साधने अपुरी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याची आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्याची पुरेशी संधी मिळत नाही.
जिल्हा परिषदेने लोकसहभाग आणि उद्योग संस्थांच्या मदतीने यापूर्वी 303 मॉडेल शाळा विकसित केल्या आहेत. त्याचबरोबर 150 हून अधिक रोबोटिक्स, खगोलशास्त्र आणि इनोव्हेशन लॅब उभारण्यात आल्या आहेत. आता आणखी 550 शाळांचे आधुनिकीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या प्रयत्नांना व्यापक स्वरूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणांची आवश्यकता आहे.
त्यासाठी आयटी कंपन्या, उद्योगसमूह, बँका, सार्वजनिक उपक्रम, स्टार्टअप्स, माजी विद्यार्थी आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीएसआर निधीतून किंवा वैयक्तिक स्वरूपात लॅपटॉप, टॅबलेट, संगणक आणि संबंधित उपकरणे देऊन या अभियानाला हातभार लावता येणार आहे.एका विद्यार्थ्याला डिजिटल उपकरण मिळाल्यास त्याच्यासाठी केवळ शिक्षणाचे साधन उपलब्ध होत नाही, तर ज्ञानाचे नवे विश्व खुले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा आत्मविश्वास देत भविष्यातील स्पर्धेसाठी सक्षम करण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सामाजिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि नागरिकांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. समाजाच्या सहकार्यातून प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्याच्या हातात डिजिटल शिक्षणाचे साधन पोहोचविण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प आहे.
कंपन्यांनी डिजिटल शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, उद्योग समूह, आयटी कंपन्या, बँका, सार्वजनिक उपक्रम आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पजिल्हा परिषदेने केले आहे. संबंधित संस्थांनी त्यांच्या सीएसआर निधीतून नवीन किंवा सुस्थितीतील संगणक, लॅपटॉप, टॅबलेट आणि अन्य डिजिटल उपकरणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून द्यावीत. या उपकरणांचा वापर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी केला जाणार आहे.
Related
Articles
ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकीत गाजणार खड्ड्यांचा विषय
05 Sep 2026
जिल्ह्यातील 3 हजार 488 शाळांना 7 कोटी 39 लाखांचे अनुदान
02 Sep 2026
व्हाट्सऍप कट्टा
03 Sep 2026
जिन्दगी कैसी है पहेली...
04 Sep 2026
जनसंपर्काने जीडीपी चमकेल,पण अर्थव्यवस्था नाही!
03 Sep 2026
ओरिगामी आणि शब्दकोडे स्पर्धेला मोठा प्रतिसाद
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार