E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ
Wrutuja pandharpure
26 Aug 2026
नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी
वडगावशेरी
: हवेली क्रमांक सात, चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित भोंगळ कारभाराचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे. कार्यालयात खासगी व्यक्ती संगणकावर कागदपत्रांची पडताळणी करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, हवेली क्रमांक सातचे सह दुय्यम निबंधक महादेव गुरव यांनी शासनाचा खूप मोठ्या प्रमाणात महसूल व नियमाचा भंग करून दस्त नोंदणी केली आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नोंदणी विभागासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याची बाब गंभीर असल्याचे सुरवसे-पाटील यांनी म्हटले आहे. महसूल आणि नोंदणी विभागात नागरिकांच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाताळली जातात. त्यामुळे या कागदपत्रांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांची योग्य पद्धतीने छाननी होणे आवश्यक आहे. मात्र, चंदननगर येथील कार्यालयातील कथित प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नोंदणी कार्यालयात अधिकारी उपस्थित नसताना नागरिकच संगणकावर कागदपत्रे तपासत असतील, तर कार्यालयाचा कारभार नेमका कोणाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे? असा सवाल सुरवसे-पाटील यांनी उपस्थित केला. कार्यालयात दस्तऐवज किती सुरक्षित आहे, याचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Related
Articles
औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना बँकांनी आर्थिक मदत करावी : सचिन अहिर
02 Sep 2026
पावसाच्या लहरीवर बाजरीचे उत्पादन; पूर्व भागात पीक फुलोर्यात
02 Sep 2026
खाद्यपदार्थ पुरवणे, मृतदेह हलविण्यासाठी ड्रोनचा वापर
03 Sep 2026
भारत ‘अ’ संघाचा न्यूझीलंड दौरा; कसोटी मालिकेपूर्वी चार दिवसीय सामने
02 Sep 2026
कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटींची तरतूद
02 Sep 2026
एसआयआर कायदेशीर; पण योग्य नाही
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार