E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
एमपीएससीतर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
Wrutuja pandharpure
26 Aug 2026
पुणे
: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)राज्य सेवा मुख्य परीक्षा-2025च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेतून एकूण 438 उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक पुण्यातील उमेदवारांचा समावेश आहे. वर्णनात्मक पद्धतीने झालेली ही पहिलीच लेखी परीक्षा असल्याने या परीक्षेच्या निकालाकडे राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागले होते.
एमपीएससीने या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय 2022मध्ये घेतला होता. मात्र, उमेदवारांनी वर्णनात्मक पद्धती लगेच लागू करण्यास विरोध केला, राज्यभरात त्याबाबत आंदोलने झाली. त्यामुळे एमपीएससीने 2025पासून वर्णनात्मक पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा 5 एप्रिल ते 2 मे या कालावधीत घेण्यात आली होती.
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या अर्जातील दाव्यांच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकोचो आढळून आल्यास, दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीवेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना, अन्य कारणामुळे अपात्र ठरणार्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणात्याही टप्यावर रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. मुलाखतीस पात्र उमेदवारांपैकी केवळ दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीपूर्वी करण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. उमेदवारांना वैद्यकीय चाचणी तारीख, ठिकाण लवकरच कळविण्यात येईल. मुख्य परीक्षमधून मुलाखतीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची फेरपडताळणी करायची असल्यास 10 दिवसांत एमपीएससीकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. जाहीर करण्यात आलेला निकाल आरक्षणाच्या, समांतर आरक्षणाच्या तसेच अन्य मुद्यांत विविध न्यायालय, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विभागनिहाय मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार
अमरावती....................15
छत्रपती संभाजीनगर........32
नागपूर........................21
नाशिक.......................28
नवी मुंबई.....................26
पुणे..........................296
Related
Articles
मनसेच्या दोघांना अटक
02 Sep 2026
देशाचे ऐक्य भंग करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही
05 Sep 2026
इस्रायलच्या हल्ल्यात लेबाननमध्ये बारा ठार
08 Sep 2026
ऑगस्टमध्ये यूपीआयचे २९.८ लाख कोटींचे व्यवहार
02 Sep 2026
जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाची 35 लाखांची फसवणूक
07 Sep 2026
सोलापूरचा गणेशोत्सव संपूर्ण डीजेमुक्त
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार