E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नाशिक विभागातील आपत्तीग्रस्त शेतकर्यांना ८६ कोटींची मदत
Samruddhi Dhayagude
26 Aug 2026
मुंबई,(प्रतिनिधी) : मागील वर्षीच्या खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या नाशिक महसूल विभागातील पात्र शेतकर्यांना ८६ कोटी ६५ लाखांच्या मदतीचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंगळवारी दिली. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पात्र शेतकर्यांना विशेष बाब म्हणून मदतीचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांची माहिती निश्चित करून मदत वाटपाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे जाधव-पाटील यांनी सांगितले. या निर्णयामुळे आपत्तीग्रस्त पात्र शेतकर्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, पुढील शेती हंगामासाठी त्यांना आधार होणार आहे. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाने काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
Related
Articles
हिमालयाची बदलती ‘लय’
06 Sep 2026
श्रीकांतचा नवव्या मानांकित व्हिक्टरवर विजय
04 Sep 2026
पूर्व विभाग मजबूत स्थितीत
07 Sep 2026
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
02 Sep 2026
शीतल अंतिम फेरीत; सरिता कांस्यपदकाच्या लढतीत
08 Sep 2026
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा गुजरातमध्ये होणार
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार