पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी 51 संघ निश्चित झाल आहेत. स्पर्धेचे लॉटस शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात काढण्यात येणार आहेत.एनबीएन सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस, नर्हेच्या संघांने मुदतीत प्रवेश अर्ज दाखल न केल्यामुळे एमआयटी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, आळंदी या संघास चिठ्ठीद्वारे प्रवेश देण्यात आला. प्राथमिक फेरीसाठीचे अर्ज सोमवार दि. 3 आणि मंगळवार दि. 4 असे दोन दिवस नातूवाडा, शनिवार पेठ येथे स्वीकारण्यात आले. एमआयटी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, आळंदी आणि एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी हे दोन संघ प्रतिक्षा यादीत होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी 16 ऑगस्ट ते रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे.
Fans
Followers