E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची स्थापना करा
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले
काठमांडू : नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी वाढत आहे. हा मुद्दा आता केवळ संघटना आणि निदर्शनांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सामान्य जनताही आपल्या प्रतिनिधींकडून थेट उत्तरांची मागणी करत आहे. प्रभावित भागांमध्ये खासदारांना घेराव घालून हिंदू समाजाच्या सुरक्षिततेच्या आणि हक्कांच्या बाजूने उघडपणे बोलण्याचे आवाहन केले जात आहे.
सिराहा जिल्ह्यात, नॅशनल इंडिपेंडंट पक्षाचे खासदार बबलू गुप्ता यांना जनतेच्या विरोधाचा सामना करावा लागला. आंदोलकांनी सांगितले की, बदलाच्या आणि हिंदू राष्ट्राच्या पुनरागमनाच्या आशेने त्यांनी आपल्या प्रतिनिधींना पाठिंबा दिला होता; परंतु आता त्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जातीय हिंसाचार शमला
२६ जुलैच्या रात्री नेपाळमध्ये सुरू झालेला हिंसाचार आता शमला आहे. अनेक जिल्ह्यांमधील तणावपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात आहे. या घटनेनंतर हिंदू संघटनांनी सरकारला १५-कलमी निवेदन सादर केले असून, नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी संसदेत ठराव मांडण्यासह अनेक मोठ्या निर्णयांची मागणी केली आहे.
या निवेदनात, या घटनेत प्राण गमावलेल्यांना शहीद दर्जा देण्याची, त्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी भरपाई देण्याची आणि जखमींवर मोफत व प्रभावी उपचार सुनिश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. बौद्ध आणि किरात परंपरांचा आदर राखून नेपाळला ’वैदिक सनातन हिंदू राष्ट्र’ म्हणून पुन्हा स्थापित करण्यासाठी संसदेत ठराव मंजूर करण्याचे आवाहनही यात करण्यात आले आहे. या संघटनांनी रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर काढण्याची, सीमा सुरक्षा मजबूत करण्याची आणि १९९० नंतर जारी केलेल्या नेपाळी नागरिकत्वाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
सरकार संघराज्यीय प्रणालीसाठी कटिबद्ध : बालेन
याबाबत बोलताना पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितले की, हिंदू राष्ट्राची पुनर्स्थापना राजेशाहीच्या मुद्द्याशी जोडलेली आहे. त्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत असा निर्णय घेणे अनुचित ठरेल. सरकार संघराज्यीय प्रणालीसाठी कटिबद्ध असून, तिचे दृढपणे पालन करेल. त्यांनी असेही म्हटले की, हिंदू राष्ट्राची घोषणा केल्याने संघराज्यीय प्रणाली कमकुवत होईल.
Related
Articles
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा
13 Aug 2026
सराव सामन्यात भारताचा विजय
10 Aug 2026
जुन्या प्रभाग 6 मधील साडेतेरा कोटींच्या कामांसाठी ’पुन्हा निविदा’ निघणार?
14 Aug 2026
विद्यार्थ्यांचा सीबीआय चौकशीचा आग्रह
10 Aug 2026
‘सीईटी’तील उच्च पर्सेंटाइल आणि बारावीतील कमी गुणांमुळे संशय
10 Aug 2026
रावणाच्या पराक्रमावर फिरले पाणी
10 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू