E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानात सत्तापालट होणार?
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
इस्लामाबादच्या सीमेवर उभे केले कंटेनर
इस्लामाबाद : पाकिस्तानात शहबाज शरीफ सरकारविरोधात बंड होण्याची जोरदार चर्चा आहे. इस्लामाबाद मोठ्या कंटेनरने सील करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर या बंडाचे सूत्रधार आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पद धोक्यात आले आहे, कारण त्यांचेच गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी सरकारविरोधात मोहीम सुरू केली आहे. असाही दावा केला जात आहे की, या बंडाचा आराखडा रावळपिंडीमध्ये तयार करण्यात आला आहे.
पाकिस्तानची शासनप्रणाली कोलमडली आहे, असे धक्कादायक विधान केल्यानंतर काही दिवसांतच गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आता आणखी एक रमोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा करत नक्वी म्हणाले की, यात न्यायाधीशांपासून ते राजकारण्यांपर्यंत सरकारी यंत्रणेतील अनेक प्रमुख सदस्यांचा समावेश आहे. नक्वी यांनी यात सामील असलेल्यांची नावे उघड केली नसली तरी, त्यांच्या वाढत्या खळबळजनक विधानांमुळे पाकिस्तानची सत्ता बदलणार आहे का, याबद्दलच्या चर्चांना जोरदार आहे.
नक्वींचा ’गैरव्यवहार बॉम्ब’ आणि व्यवस्थेवर थेट हल्ला
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या जवळचे मानले जाणारे नक्वी यांनी, या घोटाळ्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असा आग्रह धरला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात न्यायाधीश, नोकरशहा, राजकारणी आणि बँकर्स यांचा समावेश असलेला इतका मोठा घोटाळा कधी झाला असेल, असे नक्वी यांनी पत्रकारांना सांगितले. नक्वी यांनी आरोप केला की, गेल्या २१ वर्षांपासून देशातील न्यायाधीश, नोकरशहा, राजकारणी आणि बँकर्स लाचखोरीच्या रॅकेटमध्ये सहभागी होते. नक्वी यांनी उघडपणे सांगितले की, पाकिस्तानची शासनप्रणाली पूर्णपणे कोलमडली आहे, जो शाहबाज सरकारच्या कार्यक्षमतेला एक मोठा धक्का आहे.
विश्लेषकांच्या मते, नक्वी हे केवळ मंत्री नाहीत, तर असिम मुनीर यांचे एक प्यादे आहेत, ज्यांना भविष्यात एका मोठ्या राजकीय भूमिकेसाठी तयार केले जात आहे. अशीही अटकळ आहे की, परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात जसे घडले होते, त्याचप्रमाणे आसिम मुनीर यांच्यासाठी पाश्वर्र्भूमी तयार करण्याची जबाबदारी नक्वी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आसिम मुनीर यांना राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख म्हणून सर्वशक्तिमान बनवणे. या घडामोडीमुळे लंडनपासून लाहोरपर्यंत नवाझ शरीफ यांची झोप उडाली आहे.
शाहबाज सरकारचे निष्ठावान असलेले संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या अंतर्गत कलहावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. नक्वी यांना ’शक्तीचा स्रोत’ संबोधून, आसिफ यांनी टोमणा मारला की, ते स्वतःला पंतप्रधानांप्रति जबाबदार मानत नाहीत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर राहतात. आसिफ असेही म्हणाले, एवढी सत्ता असलेली व्यक्ती जर तक्रार करत असेल, तर मंत्रिमंडळातील बाकीच्या सदस्यांनी घरी जावे.
पाकिस्तानमध्ये हुकूमशाही पुन्हा सुरू होणार?
पाकिस्तानच्या सत्ता रचनेतील सर्वोच्च स्तरावरील ही दरी आता लपलेली नाही. आसिम मुनीर सध्या पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर अमर्याद सत्ता उपभोगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, नक्वी यांच्या माध्यमातून मुनीर यांनी शहबाज शरीफ यांना खरा बॉस कोण आहे, याचा स्पष्ट संदेश दिला आहे. पाकिस्तानच्या सर्वात शक्तिशाली राजकारण्यांपैकी एक म्हणून वेगाने उदयास आलेल्या नक्वी यांच्या मनात पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा फार पूर्वीपासून होती. त्यांना नेहमीच आसिम मुनीर यांचा पाठिंबा मिळाला आहे, जे लष्करप्रमुखांचे जवळचे नातेवाईक मानले जातात. त्यामुळे, मुनीर त्यांना तसे करण्यास प्रवृत्त करू शकले. विश्लेषकांचा असाही विश्वास आहे की, याच जवळच्या संबंधांमुळे मुनीर यांनी संघर्षादरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी नक्वी यांची विशेष प्रतिनिधी म्हणून निवड केली.
Related
Articles
इंडोनेशियाला भूकंपाचे धक्के; ५१- जणांचा मृत्यू
17 Aug 2026
ऐतिहासिक ध्वज आणि मादाम कामांचा स्वातंत्र्य संदेश
18 Aug 2026
वाचक लिहितात
13 Aug 2026
स्मृती इराणी, राम माधव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत
18 Aug 2026
विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहावे पदक मिळविण्याचे सिंधूचे लक्ष्य
17 Aug 2026
स्वराज्य आणि सुराज्य (अग्रलेख)
15 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा