E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ई-२० विरोधातील ‘आप’चा मोर्चा रोखला
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
केजरीवाल यांचे ठिय्या आंदोलन
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ई-२० पेट्रोलच्या विरोधात पंतप्रधानांच्या निवासस्थानवर मोर्चा काढला होता. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी फिरोजशाह रस्त्यावर रोखले. त्यानंतर, केजरीवाल यांनी तेथेच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. या मोर्चात ‘आप’चे नेते, कार्यकर्ते आणि इथेनॉल पीडित वाहन मालक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
केजरीवाल यांनी ई-२० इंधनाविरोधात मोहीम सुरू केली आहे. सुमारे २.३० लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन आणि १०० इथेनॉल पीडित वाहन मालकांना घेऊन केजरीवाल काल पंतप्रधानांच्या निवासस्थानकडे निघाले होते. दिल्ली पोलिसांनी आंदोलनास परवानगी नसल्याचे सांगत हा मोर्चा रोखला. त्यानंतर, केजरीवाल यांनी तेथेच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी केंद्र सरकारच्या इथेनॉल-मिश्रित इंधन धोरणाविरुद्ध आंदोलकांनी घोषणा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात येऊ नये. अमेरिकेतून इथेनॉल खरेदी तातडीने बंद करावी आणि देशातील जनतेवर जबरदस्तीने ई-२० इंधन लादू नये, अशी मागणी केजरीवाल यांनी यावेळी केली.
या आंदोलनात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंग, ’आप’ नेते जस्मिन शाह आणि पक्षाचे इतर नेते सहभागी झाले होते.दरम्यान, पंतप्रधानांची भेट होणार नाही, असे शिष्टमंडळाला कळवल्यानंतर पोलिसांनी ‘आप’चे निवेदन ताब्यात घेतले. आंदोलकांना फिरोज शाह रस्त्याच्या पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलांसह पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे एका अधिकार्याने सांगितले.
Related
Articles
खडकवासल्यात जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सीडब्ल्यूपीआरएसची जागा उपलब्ध होणार
13 Aug 2026
गोंधळ थांबवा (अग्रलेख)
12 Aug 2026
मायदेशात विश्वचषक जिंकून कारकिर्दीचा शेवट करण्याची मिलरची इच्छा
13 Aug 2026
चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नावर रविवारी बैठक
14 Aug 2026
‘एफ-१’ व्हिसासाठी अपॉइंटमेंट मिळेना...
14 Aug 2026
रोहिडेश्वरच्या पायथ्याला निवासाची सोय
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा