महाराष्ट्रात उष्माघाताचे सर्वाधिक बळी   

नवी दिल्ली : देशभरात १ मार्चपासून उष्माघाताचे २० बळी गेले आहेत. सर्वाधिक ११ बळी महाराष्ट्रात गेले आहेत. देशभरात ४,८५३ जणांना उष्माघाताचा त्रास झाला असून, यात सर्वाधिक रुग्ण तेलंगणातील आहेत. लोकसभेतील एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबतची माहिती दिली. 
 
महाराष्ट्रात उष्माघाताची सर्वाधिक ११ मृत्यूंची नोंद झाली. आंध्र प्रदेशात ४, तेलंगणा आणि ओडिशात प्रत्येकी २ आणि तामिळनाडूत एका मृत्यूची नोंद झाली. तेलंगणामध्ये उष्माघाताच्या सर्वाधिक ९१५ रुग्णांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये ७३३, छत्तीसगढमध्ये ६६०, आंध्र प्रदेशात ५४० आणि झारखंडमध्ये ४०९ रुग्णांची नोंद झाली. दिल्लीत उष्माघाताचा ३२ जणांना त्रास झाला.यंदा देशातील अनेक भागात उष्णतेचा भडका उडाला होता. अनेक महत्त्वाच्या शहरांत तपमानाचा पारा ४५ अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा सामना करावा लागला.

Related Articles