E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पोलिसांच्या वाहनाची सहा वाहनांना धडक
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
मद्यधुंद हवालदारास अटक
पुणे
: मद्यधुंद पोलिस हवालदाराचे पोलिस व्हॅनवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या व्हॅनने समोरील अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना टिळक रस्त्यालगतच्या देशमुखवाडीत शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातात मोटार, टेम्पो आणि दुचाकीसह पाच ते सहा वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी त्या पोलिस हवालदारास अटक करण्यात आली आहे.बाळासाहेब वसंत खैरे (वय 52) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. खैरे हा विश्रामबाग पोलिस मोटार वाहन विभागात कार्यरत आहे. या संदर्भात पोलिस हवालदार अभिषेक गोविंद लिमये (वय 38, रा. देशमुखवाडी, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवारी होणार्या पुणे दौर्याच्या पार्श्वभूमीवर टिळक रस्त्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने खैरे याने पोलिस मोटार देशमुखवाडीतील अरुंद गल्लीतून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मोटारीला त्याने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मोटार पुढील मोटार, टेम्पो आणि दुचाकीवर आदळली. त्यानंतरही खैरे याने मोटार पुढे नेत पुन्हा एका मोटारीला धडक दिली. यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर खैरे हा भिकारदास मारुती रस्त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, चैतन्य साठे आणि विश्वनाथ लिमये यांनी पोलिसाची मोटार अडवून चालकाला पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात लिमये व साठे यांच्या दोन मोटारी, अद्वैत खळदकर यांची दुचाकी तसेच तीनचाकी टेम्पोसह इतर पाच ते सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले. या प्रकरणी खैरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.
Related
Articles
श्रीलंकेच्या नौदलाकडून नऊ भारतीय मच्छीमारांना अटक
14 Aug 2026
‘जेन झी’ची दखल सरकारला घ्यावीच लागेल
12 Aug 2026
इराणकडून आडमुठेपणा; ट्रम्प यांचा आरोप
17 Aug 2026
भीमाशंकरमध्ये भाविकांचा सागर
17 Aug 2026
आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर
18 Aug 2026
मंत्रालय उपहारगृहाचा होणार कायापालट
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा