E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ’बुलडोझर न्याय’ हा घटनेचा अपमान : रमेश
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील खरगोन येथे झालेल्या रामनवमी हिंसाचार प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, काँग्रेसने मंगळवारी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. भाजपशासित राज्यांमध्ये ’बुलडोझर न्याया’च्या नावाखाली जे काही केले जात आहे, तो घटनेचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला.
रमेश म्हणाले, ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत, त्यांना पुरेशी नुकसान भरपाई द्यावी आणि यात सहभागी असलेल्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. एप्रिल २०२२ मध्ये खरगोनमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर दुसर्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने बुलडोझर कारवाई करून शहरातील पाच मुस्लिमबहुल भागांतील १६ घरे आणि २९ दुकाने पाडली होती. त्यावेळी मध्य प्रदेशचे तत्कालीन गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते, ज्या घरातून दगड फेकले गेले, त्या घरांचा दगडांचा ढिगारा केला जाईल. जयराम रमेश यांनी दावा केला की, जुलै २०२६ मध्ये मध्य प्रदेश सत्र न्यायालयाने २०२२ च्या रामनवमी हिंसाचार प्रकरणातील सर्व ११ मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
Related
Articles
आठ लाख कोटीच्या ‘एफएमसीजी’ बाजाराचे लक्ष्य
15 Aug 2026
बांगलादेशाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय
17 Aug 2026
पाकिस्तानात १० बंडखोर ठार १६ जखमी; लपलेल्या ठिकाणांवर ड्रोन हल्ले
13 Aug 2026
रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणार्या कोंदिवडेच्या मुलींनी घेतली राज यांची भेट
18 Aug 2026
लष्करी श्वान ’टायसन’चा गौरव
17 Aug 2026
15 लाखांहून अधिक मतदारांची पडताळणी; नोंदींमध्ये 7.25 लाख विसंगती
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा