व्हॉट्सअ‍ॅपसाठी आता वयाचे बंधन!   

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी वयाचे बंधन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचे (डीपीडीपी) पालन करण्यासाठी व्हॉट्अ‍ॅपने भारतातील वापरकर्त्यांना जन्मतारीख विचारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही ऐच्छिक बाब असणार आहे. मेटाने तसे स्पष्ट देखील केले आहे. वापरकर्त्यांची वयाची माहिती गोपनीय राहील आणि प्लॅटफॉर्मवरील इतरांसोबत ती शेअर केली जाणार नाही, असेही कंपनीने नमूद केले. तर, यासंदर्भात आम्ही चर्चा करू, असे माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी सांगितले. 

Related Articles