पॉलीग्राफ चाचणीच्या अर्जावर सीबीआयकडे मागितले उत्तर   

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणातील तीन आरोपींनी आपली पॉलीग्राफ चाचणी करण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर विशेष जलदगती न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) प्रतिक्रिया मागितली आहे.
 
मंगीलाल बिवाल, दिनेश बिवाल आणि विकास बिवाल यांनी हा अर्ज केला आहे. या तिघांनी आपण पॉलीग्राफ (लाय-डिटेक्टर) आणि ब्रेन इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हेशन प्रोफाईल (बीइएपी) चाचणीस तयार आहोत, असे अर्जात नमूद केले आहे. 
 
दरम्यान, या तिघांनी जामीन अर्ज केला असून, त्या अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश अजय गुप्ता घेणार आहेत. विशेष न्यायाधीश अनु ग्रोव्हर बलीगा यांची नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयाने बदली करताना गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. 

Related Articles