E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेला मुदतवाढ
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
मुंबई, (प्रतिनिधी) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यास तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकर्यांचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी, ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, आता ही योजना शेतकर्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
अशा अपघातग्रस्त शेतकर्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेल्या, शेतकर्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वर्ष वयोगटातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकर्याची पति/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) अशा एकूण २ जणांकरिता २०२३-२४ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत होती.यात मृत्यू आणि अपंगत्व आल्यास दोन लाख ते एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेस ३१ मार्च २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Related
Articles
अभिजीत दिपके पुन्हा विद्यार्थी आंदोलनात
17 Aug 2026
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात
17 Aug 2026
देशाच्या औद्योगिक विकासात सीओईपीच्या विद्यार्थ्यांचे स्थान मोलाचे
17 Aug 2026
विकसित राष्ट्राचे स्वप्न (अग्रलेख)
18 Aug 2026
‘जेन झी’ची दखल सरकारला घ्यावीच लागेल
12 Aug 2026
दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथांचे होणार डिजिटल जतन
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा