E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान; मदतीची मागणी
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विशेषतः आदिवासी भागातील शेतकर्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगर उतारावरील शेतांमधून पाण्याचे प्रचंड लोंढे वाहिल्याने अनेक ठिकाणी ओढे तयार झाले असून सुपीक माती वाहून गेली आहे. त्यामुळे अनेक शेतांमध्ये पेरणी केलेली पिके धोक्यात आली असून भविष्यात उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असले तरी केवळ पंचनामे करून प्रश्न सुटणार नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाकडून मिळणारी नियमित मदत शेती पूर्ववत करण्यासाठी अपुरी ठरणार असल्याचे मत शेतकरी मांडत आहेत. वाहून गेलेली माती परत भरणे, बांधबंदिस्ती करणे, शेत समतल करणे आणि सिंचन व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे किंवा शेती सुधार योजनेअंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. शेती पुन्हा उभी राहण्यासाठी तातडीने मदत मिळाल्यास आदिवासी शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाच्या पाण्याबरोबर शेतातील सुपीक मातीही वाहून गेली. केवळ पंचनामे करून उपयोग नाही. शेती पुन्हा उभी करण्यासाठी शासनाने विशेष आर्थिक मदत किंवा शेती सुधार योजनेतून तातडीने साहाय्य द्यावे.
- बुधाजी डामसे, शेतकरी
Related
Articles
मंचर बाजार समितीत कांद्याची आवक स्थिर; बाजारभावात वाढ
12 Aug 2026
शहरातील उड्डाणपूल, पाणीपुरवठा अन् ‘बी-2’चा प्रश्न मार्गी : महापौर कोंड्याल
18 Aug 2026
अरोनियनसोबतचा सामना प्रज्ञानानंदने बरोबरीत सोडवला
18 Aug 2026
वाराणसी विमानतळावर पिस्तुलातून गोळी उडाली
17 Aug 2026
पाकिस्तानचा लष्करी खर्च ४१ टक्क्यांनी वाढला
14 Aug 2026
रोखे विक्रीतून पाचशे कोटींची विक्रमी उभारणी
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा