तिरुवनंतपुरम : केरळममध्ये पावसाचे थैमान सुरूच आहे. मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले आहे. हवामान खात्याने काल आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता. राज्यातील पथनामथिट्टा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. अलप्पुझा, त्रिशूर, पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यांसाठी ऑरेंज तर तिरुवनंतपुरम आणि कोल्लम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला. रेट अलर्टमुळे येत्या 24 तासांत सुमारे 20 सेंटीमीटर, ऑरेंज अलर्टमुळे 11 ते 20 सेंटीमीटर तर यलो अलार्ट अंतर्गत 6 ते 11 सेंटीमीटर एवढा पाऊस पडणार आहे. दरम्यान, गेल्या 21 तासांत उत्तरेकडील जिल्ह्यांत मोठा पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे अलाप्पुझा, पथानामथिट्टा, कोट्टायम आणि कोझिकोडे येथील अनेक सखल व नदीकाठच्या भागांत पाणी साचले आहे. नागरिकांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतर करावे लागले, तसेच महत्त्वाची कागदपत्रे आणि मुलांची शालेय पुस्तके यांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
Fans
Followers