E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
फिलिपिन्सच्या अलेक्झांड्राला विजेतेपद
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
पेगुलाचा केला पराभव
डीसी ओपन टेनिस स्पर्धा
वॉशिंग्टन
: फिलिपिन्सच्या 21 वर्षीय अलेक्झांड्रा इला हिने डीसी ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. दोन दिवस चाललेल्या अंतिम सामन्यात तिने अव्वल मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 4-6, 6-4, 6-0 असा पराभव करत कारकीर्दीतील पहिलेच डब्ल्यूटीए एकेरी विजेतेपद जिंकले. डब्ल्यूटीए एकेरीचे विजेतेपद पटकावणारी ती फिलिपिन्सची पहिली महिला खेळाडू ठरली.
पुरुष एकेरीत अमेरिकेच्या तिसर्या मानांकित टेलर फ्रिट्झने स्पेनच्या राफेल जोडारचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.
पहिला सेट गमावल्यानंतर सलग आठ गेम जिंकत पुनरागमन रविवारी पावसामुळे अंतिम सामना थांबवावा लागला होता. त्यावेळी पेगुलाने पहिला सेट 6-4 ने जिंकला होता, तर दुसर्या सेटमध्ये इला 2-1 अशी आघाडीवर होती. सोमवारी सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर इलाने दमदार खेळ करत दुसरा सेट 6-4 ने जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर निर्णायक सेटमध्ये पेगुलाला एकही गेम जिंकू न देता 6-0 असा विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर इलाने सलग अखेरचे आठ गेम जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजयानंतर इला भावूक झाली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि तिने कारकीर्दीतील सर्वांत मोठ्या यशाचा आनंद साजरा केला.
विजेतेपद अविश्वसनीय
विजेतेपदानंतर इलाने सांगितले की, स्पर्धेच्या सुरुवातीला आपण ही ट्रॉफी उंचावू, अशी कल्पनाही केली नव्हती. या स्तरावरील स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून हा मोठा टप्पा असल्याचे तिने नमूद केले. अंतिम सामन्यादरम्यान आपण प्रचंड दडपणाखाली होतो आणि सर्व काही खूप वेगाने घडल्याचेही तिने सांगितले.
प्रेक्षकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
संपूर्ण सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये फिलिपिन्सचे झेंडे फडकताना दिसत होते आणि प्रेक्षकांनी इलाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. पेगुलानेही इलाविरुद्ध खेळणे कठीण असल्याचे मान्य करत स्टेडियममधील वातावरणाचे कौतुक केले. या स्पर्धेत इलाने अव्वल तीन मानांकित खेळाडूंना पराभूत करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.
फ्रिट्झचे कारकीर्दीतील 11वे विजेतेपद
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात टेलर फ्रिट्झने राफेल जोडारवर सरळ सेटमध्ये मात केली. दुसर्या सेटच्या सुरुवातीलाच त्याने जोडारची सर्व्हिस दोनदा भेदली आणि सामना आपल्या नियंत्रणात ठेवला. कारकीर्दीतील 11वे विजेतेपद जिंकल्यानंतर मोठा दिलासा मिळाल्याची भावना फ्रिट्झने व्यक्त केली.
Related
Articles
हॉटेलच्या आगीत आठ जणांचा मृत्यू
18 Aug 2026
फार्मासिस्ट पुजारी, पाटील यांच्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई
18 Aug 2026
भारत-पाकिस्तान लढत 19 ऑगस्टला
12 Aug 2026
चाकण औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांचे होणार स्थलांतर
12 Aug 2026
रेणावी घाटात भीषण अपघातात दोन ठार
14 Aug 2026
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; ११८ रस्ते बंद
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा