E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सिंधूला नववे तर सात्विक,चिरागला पाचवे मानांकन
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धा
नवी दिल्ली
: आगामी बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिला महिला एकेरीत नववे मानांकन देण्यात आले आहे. तर पुरुष दुहेरीतील भारताची आघाडीची जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पाचवे मानांकन मिळाले आहे. ही स्पर्धा 17 ते 23 ऑगस्ट या कालावधीत नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये रंगणार आहे. अलीकडेच सिंधूने जपान ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सात्विक-चिराग ही जोडी 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक
विजेती आहे.
भारताने स्पर्धेच्या पाचही गटांत प्रत्येकी दोन प्रवेशिका पाठवल्या आहेत. सिंधू आणि सात्विक-चिराग यांच्याशिवाय पुरुष एकेरीत माजी विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन याला 14वे मानांकन मिळाले आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीला 15वे मानांकन देण्यात आले आहे.पुरुष एकेरीत विद्यमान विश्वविजेता चीनचा शी युकी अव्वल मानांकित आहे. महिला एकेरीत दक्षिण कोरियाची आन से-यंग हिला पहिले मानांकन मिळाले असून, विद्यमान विश्वविजेती जपानची अकाने यामागुची दुसर्या, चीनची वांग झी यी तिसर्या आणि चेन यूफेई चौथ्या मानांकित आहेत.स्पर्धेचे ड्रॉ बुधवारी काढले जाणार आहेत. त्याआधी कोणत्याही मानांकित खेळाडूने माघार घेतल्यास मानांकन क्रमवारीत बदल होऊ शकतो.
Related
Articles
लेहमध्ये ५.५ तीव्रतेचा भूकंप
13 Aug 2026
रेणावी घाटात भीषण अपघातात दोन ठार
14 Aug 2026
दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथांचे होणार डिजिटल जतन
13 Aug 2026
अमेरिकेत वादळ आणि पुरामुळे पाच जणांचा मृत्यू
17 Aug 2026
संत साहित्यातून प्रयत्नवादाचा उपदेश
12 Aug 2026
जिंकले कोणीच नाही (अग्रलेख)
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा