E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत शेती
महाराष्ट्रात 7 ऑगस्ट हा दिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशाची अन्न सुरक्षा बळकट करणार्या डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या कार्याचा गौरव करणे हा उद्देश आहे हा दिवस साजरा करण्याचा. पर्यावरणपूरक आणि जबाबदार शेती पद्धतींचा प्रचार करणे आणि शाश्वत अन्न प्रणालीबद्दल जागरूकता निर्माण करणे. हा विशेष दिवस निसर्गाचा समतोल राखणार्या आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणार्या शेतीपद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा होतो. शाश्वत शेती म्हणजे निसर्गपूरक पद्धतीने माती, पाणी, वने आणि जिवाणूंसारख्या नैसर्गिक स्रोतांना हानी न पोहोचवता अन्न पिकवणे. महाराष्ट्रात शेती हा केवळ व्यवसाय नसून तो एक मोठा उद्योग बनला आहे, ज्यामध्ये साखर उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय मुख्य आहेत. या दिनाच्या निमित्ताने याची माहिती शेतकर्यांना देऊन त्यांचे प्रबोधन करणे हे या दिनाचे ध्येय आहे.
विजय देवधर, पुणे
रस्त्यावरील खड्डे बुजवा
ठाणे, शहापूर, नाशिक तसेच शहरातील इतर काही भागात रस्त्यांवरील खड्ड्यात पडून अनेक वाहनचालकांचे प्राण जाण्याच्या घटना घडत आहेत. काही जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या खड्डे बुजवण्याच्या सुस्त कारभारामुळे महापालिकेतील महापौर, आयुक्त त्यांच्या कारभारावर शंका उपस्थित होते. महानगरपालिकेकडून मृत वाहनचालक अथवा गंभीररीत्या जखमी झालेल्या कुटुंबीयांना ठराविक मदत दिली की, आपले काम संपले, असे जर त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. केवळ पूल, रस्ते, मेट्रो किंवा महामार्ग बांधले म्हणजे, देशाचा विकास होत नसतो. तर रस्ते हे एक दळणवळणाचे प्रमुख साधन व दुवा मानले जाते. त्यामुळे रस्ते हे सुस्थितीत असायलाच हवेत. रस्ते, खराब, खड्डेयुक्त असतील तर संबंधितांना पथकर घेण्याचा कोणताही अधिकार नाही. खड्ड्यांमुळे पालिकेच्या तसेच इतर यंत्रणांच्या गलथान कारभाराच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
जनसुराज पक्षाचे यश
राजकीय पक्षांना विजय मिळवून देणारे प्रशांत किशोर अर्थात पीके बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातून जिंकले आणि विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. बिहारमधील एक जागा आणि राज्याची वा देशाची बरोबरी होऊच शकत नाही; पण मागच्या निवडणुकीत काहीच यश न मिळालेल्या जनसुराज्य पक्षाला यश दिसले. आता भाजपची कशी पिछेहाट सुरू झाली आहे, अब दिल्ली दूर नहीं त्या चर्चा सुरू होतील. बिहारमधील निवडणूक चार वर्षे तर लोकसभा निवडणूक तीन वर्षे लांब आहे. तोपर्यंत जनसुराज्यने एका जागेच्या विजयाचा आनंद साजरा करावा व येणार्या निवडणुकांची मनापासून तयारी करावी. दुसर्या पक्षास जिंकणे वेगळे व स्वतःच्या पार्टीला जिंकणे वेगळे हे एव्हाना पीकेंना कळले असेलच.
माया भाटकर, पुणे
प्लास्टिक धोकादायक
आजकाल कोणत्याही शहरात अगदी खेड्यातसुद्धा जागोजागी प्लास्टिकचे ढीग दिसतात. विशेषतः प्लास्टिक पुलाच्या शेजारी तर मोठ्या प्रमाणात साठलेले अनेक खेड्यात दिसून येते. भाजी किंवा किराणा घेताना तो जवळ जवळ सर्वच ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांतून दिला जातो. याशिवाय अलीकडे स्वयंपाक घरात प्लॅस्टिकचा वापर वाढलेला दिसून येतो. आता दैनंदिन व्यवहारात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्लास्टिक लगेच नष्ट होत नाही आणि जमिनीत ते पुरले तरीही त्यास विघटनाकरिता 1000 वर्षे लागतात. प्लास्टिकच्या पाण्यामुळे गटारे तुंबतात व प्रचंड नुकसान होते. प्लास्टिकमध्ये टाकून दिलेल्या अन्नामुळे अनेक प्राणी ते खाऊन मरतात.
शांताराम वाघ, पुणे
जंक फूडवर बंदी हवीच
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत पिझ्झा, बर्गर, चिप्स, शीतपेये आणि इतर प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे आकर्षण मुलांमध्ये वाढले आहे. या पदार्थांमध्ये साखर, मीठ, तेल आणि कृत्रिम घटकांचे प्रमाण अधिक असल्याने लठ्ठपणा, मधुमेह, दातांचे विकार आणि इतर आरोग्य समस्या लहान वयातच निर्माण होत आहेत. केवळ बंदी घालणे पुरेसे नाही, तर शाळांमध्ये आणि परिसरात पौष्टिक पर्याय उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. फळे, दूध, ताक, मोड आलेली कडधान्ये आणि पौष्टिक नाश्ता यांना प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या आहाराच्या सवयी विकसित होतील. यासाठी शाळा, पालक, स्थानिक प्रशासन आणि विक्रेते यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी जनजागृती करणेही गरजेचे आहे. निरोगी विद्यार्थी हेच देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.
श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे
Related
Articles
महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर 45 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती
14 Aug 2026
स्वराज्य आणि सुराज्य (अग्रलेख)
15 Aug 2026
उद्योगांचे स्थलांतर केवळ अफवा ! : उदय सामंत
17 Aug 2026
होर्मुझवर अमेरिकेचे नियंत्रण : ट्रम्प यांचा दावा
14 Aug 2026
भारत सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार
13 Aug 2026
फार्मासिस्ट पुजारी, पाटील यांच्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा