E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानने खरेदी केल्या 250 ‘एसएच-15’ तोफा
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
भारताच्या पश्चिम सीमेजवळ टप्प्याटप्प्याने तैनाती
इस्लामाबाद
: पाकिस्तानने आपली तोफखाना क्षमता वाढवण्यासाठी चीनकडून 250 अत्याधुनिक एसएच-15 मालमोटार-माउंटेड स्वयंचलित तोफा खरेदी केल्या आहेत. या तोफांची भारताच्या पश्चिम सीमेवर टप्प्याटप्प्याने तैनाती सुरू केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने समोर आली आहे. उत्तर ते दक्षिण संपूर्ण सीमावर्ती पट्ट्यात या तोफा तैनात केल्या जात असल्याने सीमाभागातील लष्करी घडामोडींना वेग आला आहे.
पाकिस्तानने या आधुनिक तोफा सीमेलगतच्या महत्त्वाच्या भागांमध्ये तैनात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या सीमावर्ती चौक्या, दळणवळणाचे मार्ग आणि महत्त्वाच्या संरक्षण तळांवर या तोफांच्या संभाव्य मारक क्षमतेचा प्रभाव पडू शकतो. या हालचालींवर भारतीय सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. चीनची सरकारी संरक्षण कंपनी नॉरिंको निर्मित एसएच-15 ही 52 कॅलिबरची स्वयंचलित तोफ असून, ती 66 चिलखती मालमोटारीवर बसवलेली आहे. सामान्य दारूगोळ्याने ती 30 ते 40 किलोमीटर, तर रॉकेट-असिस्टेड दारूगोळ्याने 53 ते 72 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर अचूक मारा करू शकते. हायड्रॉलिक प्रणालीमुळे अवघ्या एका मिनिटात सहा गोळे डागून त्वरित स्थान बदलण्याची क्षमता या तोफेत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची हालचाल
भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर पाकिस्तानने आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनकडून मोठ्या प्रमाणावर आधुनिक तोफांची खरेदी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संरक्षण क्षेत्रातील चीन-पाकिस्तान सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचेही या हालचालींवरून स्पष्ट होत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सीमाभागात संभाव्य आव्हानाला तोंड देण्यासाठी लष्करी सज्जता कायम ठेवली आहे.
Related
Articles
रशियाच्या आंतरराष्ट्रीय लवादात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड मध्यस्थ
14 Aug 2026
बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूची विजयी सुरुवात
18 Aug 2026
सिंधूच्या पाण्याबाबत तडजोड नाही; शाहबाज यांची दर्पोक्ती
15 Aug 2026
डॉ. प्रभा अत्रे संगीत साहित्य-संशोधन पुरस्कार जाहीर
18 Aug 2026
भारताकडे 178 धावांची आघाडी
18 Aug 2026
‘शुद्धीकरणा’वरून खर्गे संतापले...
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा