E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बांगलादेशच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार निवडीचे अधिकार रहमान यांच्याकडे
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
ढाका
: बांगलादेशातील सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार निवडण्याचे अधिकार पंतप्रधान तथा पक्षप्रमुख तारिक रहमान यांना दिले आहेत. हा निर्णय शनिवारी झालेल्या बीएनपीच्या राष्ट्रीय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.पंतप्रधान रहमान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. बीएनपीचे महासचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर म्हणाले, स्थायी समितीने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व आवश्यक निर्णय घेण्याची तसेच पक्षाच्या उमेदवाराची निवड करण्याची जबाबदारी पंतप्रधान रहमान यांच्यावर सोपविली आहे.
दरम्यान, 24 जुलै रोजी तत्कालीन अध्यक्ष महमद शहाबुद्दीन यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर संसदेचे अध्यक्ष हाफिजुद्दीन अहमद यांनी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.बांगलादेशाच्या संविधानातील अनुच्छेद 123(2) नुसार, राष्ट्रपतिपद रिक्त झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत त्या पदासाठी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे देशात लवकरच अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
Related
Articles
ऐतिहासिक ध्वज आणि मादाम कामांचा स्वातंत्र्य संदेश
18 Aug 2026
टेक्सासमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
14 Aug 2026
घाऊक महागाईत किरकोळ घट
15 Aug 2026
मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल
14 Aug 2026
कुलगुरू डॉ. महानवर यांना मानद कर्नल पदवी प्रदान
12 Aug 2026
विमाननगरमध्ये मोटारीला आग
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा