E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
घुसखोरांना आता युरोपात ‘नो एन्ट्री’
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
22 देशांचा नवा सीमा सुरक्षा आराखडा
ब्रुसेल्स
: स्पेनमधील सेउता येथे निर्माण झालेल्या घुसखोरीच्या संकटानंतर युरोपियन महासंघाने बेकायदेशीर स्थलांतरांविरोधात कारवाई सुरू केली आहे. 27 पैकी 22 सदस्य देशांनी सीमा सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी नव्या ‘प्रवेश बंदी’धोरणाची मागणी केली आहे. या प्रस्तावावर उद्या (मंगळवारी) होणार्या गृहमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा होणार असून, इटली, जर्मनी आणि ब्रिटनसह अनेक देश या कठोर भूमिकेच्या बाजूने आहेत. मात्र, स्पेनसह पाच देशांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.
घुसखोरी रोखण्यासाठी सहा स्तरांवरील कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये महासंघाच्या बाह्य सीमांचे संरक्षण मजबूत करणे, फ्रंटेक्स या सामायिक सीमा सुरक्षा दलातील अधिकार्यांची संख्या वाढवणे, मोरोक्कोसारख्या ट्रान्झिट देशांसोबत सहकार्य वाढवणे, मानवी तस्करी करणार्या टोळ्यांविरुद्ध संयुक्त कारवाई करणे, आश्रयाचा अर्ज फेटाळलेल्या स्थलांतरितांना तातडीने मायदेशी पाठवणे आणि आवश्यकतेनुसार अंतर्गत सीमांवर तात्पुरती तपासणी सुरू करणे या उपायांचा समावेश आहे.
फ्रंटेक्सच्या आकडेवारीनुसार, 2009 ते 2025 या कालावधीत चार प्रमुख सागरी मार्गांद्वारे 35.25 लाख बेकायदेशीर स्थलांतरितांनी युरोपात प्रवेश केला. यामध्ये पूर्व भूमध्य मार्गावर 17.81 लाख, मध्य भूमध्य मार्गावर 13.03 लाख, पश्चिम भूमध्य मार्गावर 2.65 लाख आणि अटलांटिक-कॅनरी मार्गावर 1.76 लाख प्रवेशांची नोंद झाली आहे.
आफ्रिकन देशांतील घुसखोरांची संख्या सर्वाधिक
2025 मध्ये युरोपियन महासंघामध्ये 7.19 लाख बेकायदेशीर स्थलांतरित आढळले. त्यामध्ये अल्जेरियाचे 71 हजार 15 नागरिक सर्वाधिक असून, अफगाणिस्तान 42 हजार 750 आणि मोरोक्को 39 हजार 50 अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहेत. अल्जेरिया आणि मोरोक्को या दोन आफ्रिकी देशांतील नागरिकांचा एकूण घुसखोरीत15 टक्के वाटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Related
Articles
पुढील २० वर्षांत भारत अंतराळ महासत्ता बनणार : मॉरिसन
15 Aug 2026
सराव सामन्यात भारताचा विजय
10 Aug 2026
अवैध वाळू उपसा केल्यास आता दहापट दंड
10 Aug 2026
बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीएच्या पहिल्या फेरीत 12 हजार 282 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
11 Aug 2026
राज्यात पावसाचा अंदाज कायम
13 Aug 2026
हिमाचलमध्ये पावसाचा कहर
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू