E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ब्रिज भूषण, विनोद तोमर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ
नवी दिल्ली
: संपूर्ण क्रीडा विश्वाला हादरवून टाकणार्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणाचा निकाल सोमवारी लागला. त्या अंतर्गत भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिज भूषण शरण सिंह यांची दिल्ली उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. महासंघाचे माजी सहायक सचिव विनोद तोमर यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवार यांनी पुराव्याचा अभाव असल्याचे सांगत निर्दोेष मुक्त केले या निर्णयाला आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती विनेश फोगट यांनी दिली.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेती विनेश फोगटसह सहा महिला कुस्तीपटूंनी सिंह आणि तोेमर यांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवत तक्रारी दाखल केल्या होत्या. प्रकरण 2023 मधील कुस्तीपटूंच्या लैंंगिक छळाचे आहे. दरम्यान, न्यायालयाने बंदिस्त कक्षात (इन-कॅमेरा) सुनावणी घेत हा निकाल काल जाहीर केला. सरकारी वकील राजीव मोहन यांनी सांगितले की, विसंगती, परस्परविरोधी विधाने, घटनेची अशक्यता आणि (घटनास्थळी उपस्थित नसल्याचा मुद्दा) यांबाबतचे त्यांचे युक्तिवाद न्यायालयाने मान्य केले आणि दोघांची निर्दोष मुक्तता केली. महिला कुस्तीपटूंच्या वतीने ज्येष्ठ वकील रेबेका जॉन यांनी बाजू मांडली.
दरम्यान, महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप एप्रिल ते मे 2023 मध्ये झाल्यामुळे ही बाब संपूर्ण क्रीडा विश्वाला हादरवून टाकणारी ठरली होती. कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी अन्यायावरोधात दिल्लीतील जंतर मंतर येथे 36 दिवस आंदोलन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने सात कुस्तीपटूंच्या अर्जाची दखल घेतली होती, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी सहा वेळा खासदार राहिलेले ब्रिज भूषण सिंह यांच्याविरोधात जून 2023 मध्ये आणि तोमर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (महिलेचा लज्जा भंग करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या बळाचा वापर), 354A (लैंगिक छळ), 354 ए (पाठलाग करणे) आणि 506 (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे) अन्वये आरोपपत्र दाखल केले होते. एका अल्पवयीन कुस्तीपटूने दाखल केलेला स्वतंत्र एफआयआर नंतर पोलिस तपासाअंती बंद करण्यात आला.
दिल्लीतील एका न्यायालयाने मे 2024 मध्ये सिंह यांच्यावर लैंगिक छळ, धमकी देणे आणि महिलांचा लज्जा भंग करणे, तसेच तोमर यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे यांबाबत आरोप निश्चित केले. सहा महिला कुस्तीपटूंपैकी एकीने दाखल केलेल्या तक्रारीच्या बाबतीत, तिच्या दाव्याला पुष्टी देणारा पुरेसा पुरावा नसल्याचे कारण देत न्यायालयाने सिंह यांना आरोपातून मुक्त केले. त्यानंतरच्या महिन्यात खटल्याचे कामकाज सुरू झाले. मे 2025 मध्ये, न्यायालयाने अल्पवयीन कुस्तीपटूच्या प्रकरणातील पोलिसांचा ’क्लोजर रिपोर्ट’ (प्रकरण बंद करण्याचा अहवाल) स्वीकारला. दोन वर्षांहून अधिक काळ बंदिस्त कक्षात (इन-कॅमेरा) खटल्याचे कामकाज चालले आणि न्यायालयाने 2 जुलै 2026 रोजी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला.
लढा पुढे सुरू राहणार...
विनेश फोगट यांनी ’एक्स’वर पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही आणि लढा पुढे सुरूच ठेवला जाईल. सुरुवातीपासूनच संपूर्ण प्रशासन, सरकार आणि यंत्रणा ब्रिज भूषण यांना वाचवण्यात गुंतलेली आहे. न्यायालयाने ब्रिज भूषण शरण सिंह यांना दोषी ठरवले नसल्याने आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. सिंह यांनी अनेक मुलींना धमकावून त्यांची नावे मागे घ्यायला भाग पाडले, असा आरोपही फोगाट यांनी केला. सत्ताधारी पक्षातील एका प्रभावशाली नेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी आणि रस्त्यावर उतरण्यासाठी आम्हाला खूप धैर्य एकवटावे लागले. आपल्या प्रभावाचा आणि राजकीय सत्तेचा वापर करून, ब्रिज भूषण यांनी अनेक मुलींवर दबाव आणला आणि त्यांना आपली नावे मागे घेण्यास भाग पाडले. तरीही, अनेक महिला कुस्तीपटू ठाम राहिल्या आणि त्यांनी ब्रिज भूषण यांच्याविरुद्ध न्यायालयात लढा सुरू ठेवला, असे त्या म्हणाल्या.
Related
Articles
चीनचे माजी पंतप्रधान झू रोंगजी यांचे निधन
13 Aug 2026
मायदेशात विश्वचषक जिंकून कारकिर्दीचा शेवट करण्याची मिलरची इच्छा
13 Aug 2026
अनधिकृत व्यवस्था शहरास बाधक, समाजास घातक
13 Aug 2026
टेक्सासमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
14 Aug 2026
किरकोळ महागाईत वाढ
13 Aug 2026
श्रेयसी जोशीला कांस्यपदक
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा