दतियामध्ये काँग्रेसची मुसंडी   

घनश्याम सिंह यांचा विजय

दतिया : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा 12 व्या फेरीत सुमारे 12 हजार 607 मतांनी पराभव केला. या विजयामुळे काँग्रेसने विधानसभेत मुसंडी मारल्याचे चित्र आहे. घनश्याम सिंह सुरुवातीपासून आघाडीवर होेते. नंतर त्यांच्या मतांचे अंतर वाढत गेले आणि शेवटी त्यांनी अखेर बाजी मारली. यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भोपाळ येथील मुख्यालय आणि परिसरात आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी गोड पदार्थ वाटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी सिंह यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नेते आणि कार्यकर्ते यांचा सामूहिक विजय असल्याची भावना प्रकट केली. 
 
विजयानंतर घनश्याम सिंह म्हणाले, मला खात्री होती की, मी 12 हजार ते 15 हजार मतांच्या फरकाने विजयी होईन. दरम्यान, सिंह यांना 58 हजार 417 मते तर तिवारी यांना 45 हजार 810 मते पडली. त्यामुळे सिंह यांचा विजय 12 हजार 697 मतांनी झाला आहे. आझाद समाज पक्षाचे उमेदवार दामोदर यादव यांना तिसर्‍या क्रमांकाची 17 हजार 489 मते पडली. मतमोजणीच्या तीन फेर्‍या बाकी असताना सिंह यांचा विजय होत असल्याच चाहुल लागली होती. 

Related Articles