पोलिस कारवाईविरोधात एनएसयूआयचा मोर्चा   

अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : 20 जुलै रोजी झालेल्या ’संसद चलो’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईत पेलेट गनसह अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) सोमवारी जंतर-मंतरपर्यंत ’विद्यार्थी न्याय मोर्चा’ काढला. यावेळी  या विद्यार्थ्यांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 
 
काँग्रेस पक्षाची अधिकृत विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयने सांगितले की, आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी त्यांच्या सदस्यांना एका चौकात थांबवण्यात आले. रायसीना रोडवरील इंडियन यूथ काँग्रेसच्या कार्यालयापासून जंतर-मंतरच्या दिशेने मोर्चा सुरू केल्यानंतर आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यामुळे सुमारे 10 ते 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मोर्चापूर्वी जमावाला संबोधित करताना, एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर यांनी विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचे आदेश कोणी दिले, असा प्रश्‍न विचारला याचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी केली.

Related Articles