E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मोदींनी पदवी जाहीर करावी; मग मी शैक्षणिक खर्चाचा हिशेब देईन : दिपके
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
छत्रपती संभाजीनगर
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली शैक्षणिक पदवी सार्वजनिक करावी. त्यानंतर मी माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा आणि खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करेन. माझी पदवी खरी आहे. मोदी यांचीही पदवी खरी असेल, अशी अपेक्षा आहे, असे वक्तव्य कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केले. त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान दिले.
आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिपके यांनी ही भूमिका मांडली. माझी पदवी खरी आहे. नरेंद्र मोदी यांचीही पदवी खरी असेल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.दिपके यांनी 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी कॉक्रोच जनता पार्टीची बैठक होणार असल्याची माहिती दिली. या बैठकीला पक्षाचे प्रवक्ते आणि अलीकडील आंदोलनात सक्रिय असलेले कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, संघटनेचा विस्तार, आगामी आंदोलनांची दिशा आणि पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडील काळात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट घेतली असली, तरी कॉक्रोच जनता पार्टी कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न झालेली नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. आवश्यकता भासल्यास दिल्लीतील जंतरमंतर येथे पुन्हा आंदोलन छेडण्याचाही इशारा त्यांनी दिला.नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचे सांगताना दिपके म्हणाले, आम्हाला ही जनचळवळ म्हणूनच पुढे न्यायची आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत नवीन पक्ष स्थापन करून फारसे काही साध्य होणार नाही. निवडणुकांवरील लोकांचा विश्वास कमी होत आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षांतर करतात, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जातात आणि निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अशा परिस्थितीत नवीन पक्ष स्थापन करण्याचा काय उपयोग? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Related
Articles
पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्यावर तब्बल ५६,७७९ हरकती
10 Aug 2026
भीमाशंकर मंदिर राहणार १३ ऑगस्टपासून पूर्णवेळ खुले
11 Aug 2026
मराठी बोलता न आल्यास तीन महिन्यांत परवाना रद्द
13 Aug 2026
पुणे-लोणावळा मार्गावरील रेल्वे फाटके होणार बंद
10 Aug 2026
घाऊक महागाईत किरकोळ घट
15 Aug 2026
खनिज तेलाचे दर वाढले
11 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पब पार्टी प्रकरण
2
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
3
अक्कलकोटमध्ये शाळेच्या छताचा भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी
4
राज्यात पावसाचा अंदाज कायम
5
किरकोळ महागाईत वाढ
6
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू