E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महापालिकेच्या 35 कोटींच्या थकीत भाड्याच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबवा
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
पुणे
: महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांवरील 35 कोटींहून अधिक थकीत भाड्याची प्रभावी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महसूल वाढ समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिले.भिमाले म्हणाले, सर्व थकबाकीदारांना 30 दिवसांच्या आत अंतिम नोटिसा बजावाव्यात. जाणीवपूर्वक थकबाकी ठेवणार्या भाडेकरूंवर दंडासह कायदेशीर कारवाई तातडीने सुरू करावी. महापालिकेच्या मालमत्तांपासून मिळणारा महसूल हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याने वसुलीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही.
ते पुढे म्हणाले, मालमत्ता व्यवस्थापन अधिक पारदर्शक करण्यासाठी सर्व मालमत्तांचे डिजिटल ऑडिट करावे. थकबाकी, करार आणि प्रत्यक्ष वापराचा आढावा घेऊन बाजारभावानुसार सर्व करारांचे पुनर्मूल्यांकन करावे. आवश्यक तेथे सुधारित करार करून महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. महानगरपालिकेच्या मालकीच्या 1,932 सदनिका, 263 इमारती आणि 1, 552 मोकळ्या जागा असून, त्यापैकी 2,407 मालमत्तांवर तब्बल 35 कोटी 44 लाख 28 हजार 690 इतकी भाडे थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी मोकळ्या जागांच्या भाड्याची असून त्यानंतर सदनिका आणि इमारतींचा क्रम लागतो. अनेक वर्षांपासून प्रभावी वसुली न झाल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून, नियमित भाडे भरणार्या भाडेकरूंवर अन्याय होत असल्याचेही या आढाव्यात समोर आले.
Related
Articles
इंडोनेशियाला भूकंपाचे धक्के; ५१- जणांचा मृत्यू
17 Aug 2026
बुमरा सलग 21 महिन्यांपासून कसोटीत अव्वल
13 Aug 2026
नाकेबंदी धुडकावणार्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
13 Aug 2026
बॅडमिंटन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूची विजयी सुरुवात
18 Aug 2026
‘व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी’पेक्षा साहित्यातून ज्ञानशाखेशी नाते जोडा
17 Aug 2026
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा