E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिशाचा शानदार विजय
Wrutuja pandharpure
04 Aug 2026
ज्युनियर पुरुष हॉकी राष्ट्रीय चॅम्पियनशिप सपर्धा
कोयंबतूर
: 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या सातव्या दिवशी कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिशा संघांनी दमदार कामगिरी करत आपल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला.‘अ’ गटातील सामन्यांमध्ये कर्नाटकने बंगालचा 4-3 असा पराभव करत स्पर्धेतील आपली ताकद दाखवून दिली. त्याच धर्तीवर झारखंडनेही दिल्लीवर 4-3 अशाच फरकाने रोमांचक विजय नोंदवला. दोन्ही सामने कोयंबतूर हॉकी मैदानावर खेळवण्यात आले.
दिवसातील इतर सामन्यांमध्ये मध्य प्रदेशने यजमान तामिळनाडूवर एकतर्फी वर्चस्व गाजवत 4-0 असा विजय मिळवला. तर ओडिशाने मणिपूरला 4-1 अशा फरकाने पराभूत केले.या सामन्यांमध्ये खेळाडूंनी आक्रमक हॉकीचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कर्नाटक आणि झारखंडच्या सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली, तर मध्य प्रदेश आणि ओडिशाने आपल्या नियोजनबद्ध खेळाच्या जोरावर सहज विजय मिळवला.
दरम्यान, मणिपूर आणि दादरा व नगर हवेली व दमण-दीव यांच्यातील सामना 4-4 असा बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी शेवटपर्यंत संघर्ष करत सामना रोमांचक बनवला.ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये देशभरातील युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवत असून, आगामी भारतीय हॉकी संघासाठी नव्या खेळाडूंच्या शोधाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.
Related
Articles
यशवंत साखर कारखान्याच्या कामगारांचे ४३ कोटींचे वेतन व देणी थकीत
13 Aug 2026
रोखे विक्रीतून पाचशे कोटींची विक्रमी उभारणी
14 Aug 2026
न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीत साजरा होणार भारतीय स्वातंत्र्यदिन
13 Aug 2026
व्हॉट्सऍप कट्टा
18 Aug 2026
टेक्सासमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
14 Aug 2026
मायदेशात विश्वचषक जिंकून कारकिर्दीचा शेवट करण्याची मिलरची इच्छा
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा